एक आदर्श व्यक्तिमत्व - उद्योजक श्री. वसंत नामे | Entrepreneur Vasant Name Parleshwar Vada Pav



पार्लेश्वर वडापाव सम्राट - उद्योजक श्री. वसंत नामे 

गाव व्हावया निरोगी सुंदर। सुधारावे लागेल एकेक घर।
आणि त्यातून हि घरात राहणार। करावा लागेल आदर्श।

Vasant Name Parleshwar Vada Pav Samrat माझ्या गावाला लाभलेले गगनगड रम्य घटमाथे आणि निसर्गसौंदर्य ही जणू निसर्गाची देणगी आणि पूर्वजांची पुण्याईच म्हणावी लागेल. आज मी म्हणतो, "गाव असावं माझ्या गावासारखा, चांगली माणसं, चांगली मने, तंटेमुक्त आणि सरळ साधा" पण ते खरंच तसं आहे काय? माझ्या गावाचा सर्वांगीण विकास झाला आहे काय? हे अगोदर पाहायला हवे. गावाचे नाव हे फक्त तालुका आणि जिल्हापूर्तीच मर्यादित न राहता जगाच्या नकाशावर उठून दिसावं असे कोणाला नाही वाटणार? आपल्या मातीसाठी, मातीतल्या लोकांसाठी, जन्मभूमीसाठी सतत काहीतरी नवीन करण्याची वृत्ती, आवड त्यांच्या मनांत असायला हवी. अशीच काही आदर्श व्यक्तिमत्वे माझ्या गावातही आहेत. ज्यांना आपल्या गावाचा सर्वांगणी विकास व्हावा असं मनापासुन वाटतं आणि त्यासाठी ते सतत प्रयत्नात देखील असतात. असेच गावातील एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे पार्ल्यातील प्रसिद्ध उद्योजक, पार्लेश्वर वडापाव सम्राट मा. श्री. वसंत रामजी नामे. Entrepreneur Vasant Name Parleshwar Vada Pav.


                                                        

Parleshwar Vadapav Samrat Vasant Name
मा. श्री वसंत रामजी नामे

मुंबईत पावलागणिक वडापाव मिळत असले तरी काही ठरावीक ठिकाणच्या वडापावची चव कायमस्वरूपी लक्षात राहते. असा वडापाव खाण्यासाठी मुद्दाम वाट वाकडी केली जाते. मुंबईचं सांस्कृतिक केंद्र असलेल्या पार्ल्यातही पालेश्वर वडापाव नावाचा एक ब्रँड झाला आहे. मुंबईचं सर्वमान्य खाद्य कोणतं तर ते वडापाव. गरीब असो की श्रीमंत कोणालाही आवडेल, रुचेल असा हा पदार्थ. तो मुंबईत तर मिळतोच त्याचबरोबर संपूर्ण भारतभर विविध रूपात येऊन समोर ठाकतो. मुंबापुरीत तुम्हाला हा वडापाव अगदी सर्वच गल्ली बोळांमध्ये सापडतोच सापडतो. काही ठरावीक ठिकाणच्या वडापावची चव मात्र सगळ्यांनाच ठाऊक असते. तो वडापाव खाण्यासाठी खास वाकडी वाट करून त्या ठिकाणी जाणा-या खवय्यांची संख्याही काही कमी नाही. मुंबईचं सांस्कृतिक केंद्र असलेल्या पाल्र्यातही असाच एक वडापाव आहे, जो आता एक ब्रॅण्ड म्हणून उदयाला येत आहे. या वडापावचं नाव आहे पार्लेश्वर वडापाव.



पार्लेश्वर वडापावची सुरुवात केली ती वसंत रामजी नामे यांनी. मूळचे मु. पो. पालू, ता. लांजा, रत्नागिरी गावचे असलेले वसंत यांनी आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर एका शाळेत शिपायाची नोकरी पत्करली. तुटपुंज्या पगारात भागत नव्हतं. त्यात नुकतंच लग्न झालेलं. आपण वडापावची गाडी सुरूकरण्याचा प्रस्ताव त्यांनी आपल्या घरी ठेवला. पत्नी शुभदा व आई रत्नाबाई यांनी त्यांना मदत करायचं ठरवलं. पाल्र्यातल्या लोकांसाठी व्यवसाय करायचा म्हणजे त्यात स्वच्छता महत्त्वाची असते. त्यामुळे खास पांढ-या रंगाचा सनमाइका वापरून त्यांनी गाडी तयार केली. शाळा सुटल्यावर दुपारी चार ते नऊ या वेळेत त्यांनी पार्लेश्वर मंदिराजवळ आपली गाडी लावायला सुरुवात केली. त्यांना आपल्या व्यवसायाचा पहिला दिवस आजही आठवतो. ते म्हणतात, ‘त्या दिवशी मी साठ रुपयांचा धंदा केला होता. त्यावेळी वडापावची किंमत ही केवळ दोन रुपये होती’. आज त्यांच्या व्यवसायाला पंचवीसपेक्षा अधिक र्वष झाली आहेत. या पंचवीस वर्षातला त्यांचा टर्नओव्हर महिना तीस लाख रुपयांवर पोहोचला आहे.

या व्यवसायात राहायचं असेल तर प्रामाणिकपणा व सतत स्वत:ला अपडेट करत राहिलं पाहिजे हे त्यांनी ओळखलं होतं. त्यामुळे ज्यावेळी अनेक जण केवळ गाडीवर समाधानी राहात तेव्हा त्यांनी आपलं बस्तान दुकानात हलवलं. त्यातून त्यांचा इतर त्रास कमी होऊन त्यांना व्यवसायावर अधिक लक्ष केंद्रित करता आलं. त्यांच्या प्रामाणिकपणाची सुरुवात होते ती या वडापावसाठी लागणा-या कच्च्या मालापासून. त्यामुळे ती सगळी खरेदी ते स्वत:च करतात. वडय़ासाठी खास उत्तर प्रदेशातल्या शिरसागंज इथले बटाटे वापरले जातात. बेसन, तेल या सा-या गोष्टी अगदी उच्च प्रतीच्या असाव्यात असा त्यांचा कटाक्ष असतो. पार्लेश्वर वडापाव केवळ वडापावसाठी प्रसिद्ध असला तरी या ठिकाणी इतरही अनेक रुचकर पदार्थ मिळतात. त्यात बटाटा भजी, कांदाभजी तर असतातच, त्याचबरोबर कोथिंबीर वडी व चायनीज भज्यांचाही समावेश आहे.


Parleshwar Vadapav Samrat

मुंबईतील प्रसिद्ध वडापाव Famous Vada Pav in Mumbai म्हणून त्यांची कीर्ती पसरली आहे. पार्लेश्वरचा वडापाव एका खास चवीचा असतो. त्यात उकडलेल्या बटाटय़ात आलं, लसूण आणि कोथिंबीर टाकून त्याचं सारण केलं जातं. त्यानंतर चांगल्या प्रतीच्या बेसनात घोळवून तो तळला जातो. या ठिकाणी वापरण्यात आलेला पावही मोठय़ा आकाराचा असून तो खास बनवून घेतला जातो. गेल्या अनेक वर्षामध्ये पार्लेश्वरने आपला वडय़ांचा मोठा आकार कायम ठेवला आहे. त्या पावावर मग हिरवी आणि गोड चटणी टाकली जाते. त्यानंतर मग कोरडी लसूण चटणी टाकली जाते आणि तयार होतो जगातला सर्वात स्वस्त व हायजिनिक इंडियन बर्गर. इथली कांदा भजीही अगदी कुरकुरीत, केवळ कांद्याचा व त्यात टाकलेल्या अख्ख्या धण्याचाच काय तो स्वाद. ही कांदा भजी पाव किंवा मिरचीबरोबर किंवा मग चटणीबरोबर कशाही सोबत ख्खा. तुम्हाला ती आनंद देणारच.

इथली बटाटा भजीही वैशिष्टय़पूर्ण आहेत. त्यात ओवा टाकला जातो. इथली कोथिंबीर वडी खास जैन रूपात मिळते. अनेक जैन बांधव या कोथिंबीर वडीचे फॅन आहेत. पट्टी समोसा हे पार्लेश्वरचं आणखी एक वैशिष्टय़ आहे. मुंबईत अनेक प्रकारचे समोसे मिळतात. त्यात खास मराठी चवीचा समोसा कोणता असेल तर तो हा. या समोशाच्या सारणात कांद्याचा अधिक प्रमाणात वापर केला जातो. कांदा, बटाटा व हिरवा वाटाणा यांची भाजी या पट्टीत भरून त्याला समोशाचा आकार द्यायचा. या सारणातल्या मसाल्यामध्ये हिरव्या मसाल्यात केवळ आलं व मिरची याची पेस्ट व त्याच्याबरोबर मिरी, लवंग, दालचिनीचा समावेश असलेला खास गरम मसाला टाकला जातो. हा समोसा पावाबरोबर वगैरे खाल्ला जात नाही. त्यासाठी मग पंजाबी समोशाचाही पर्याय इथे आहेच.


श्री. नामे (Vasant Name) यांनी वडापावबरोबर भजी ठेवण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांनी वेगवेगळी भजी आणली. त्या काळात चायनीज पदार्थानी आपलं बस्तान बसवलं होतं. यावेळी एकदा मंच्युरियन खाताना त्यांनी या मंच्युरियनचा वापर करून आपण चायनीज भजी तयार केली तर काय असा विचार आला. त्यावर मग त्यांनी हे मंच्युरियनची भजी ठेवायला सुरुवात केली. जवळजवळ एक महिनाभर ते यावर अभ्यास करत होते. या काळात अनेकांना ही भजी खाऊ घालून त्यांच्याकडून मतं मागवली होती. आज नाक्यानाक्यांवर जी चायनीज भजी मिळतात त्याची सुरुवातही पार्लेश्वरनेच केली आहे.

पार्लेश्वरने Parleshwar Vada Pav केवळ चवच सांभाळली असं नाही, तर आपला व्यवसाय वाढावा यासाठीही दमदार पावलं टाकली. आज नामे यांच्या जोडीला त्यांची दोन्ही मुलंही त्यांना या कामात मदत करतात. प्रशांत व तेजस ही मुलं आपल्या वडिलांच्या बरोबरीने अनेक जबाबदा-या उचलतात. आपल्या व्यवसायात नित्य नव्या गोष्टी आणाव्या अशी त्यांच्या मनात नेहमी इच्छा असते. एकेकाळी वडापाव हा केवळ वर्तमानपत्राच्या रद्दीत बांधून दिला जात असे. त्याला पर्याय म्हणून त्यांनी पांढ-या शुभ्र कागदात वडापाव देण्यास सुरुवात केली. त्यांच्याकडून अनेक जण वडापाव घेऊन जातात. ज्या भोगले चौकात हा वडापाव आहे तो रस्ता विमानतळाकडे जाणारा असल्याने अनेक जण आपल्याबरोबर परदेशीही वडापाव घेऊन जातात. त्यांच्यासाठी हा वडापाव खास फॉइलमध्ये दिला जातो. 

या व अशा अनेक नव्या नव्या योजना आणून त्यांनी हा व्यवसाय केला आहे. त्याचबरोबर आमची कुठेही शाखा नाही, अशी वृथा अभिमानाने सांगणा-यांना सणसणीत चपराक लावत त्यांनी दादरमध्ये आपली दुसरी शाखा काढली. आपला हा व्यवसाय अधिक वाढवायचा त्यांचा विचार आहे. आपल्या व्यवसायात सतत काही ना काही नवीन देत त्यांनी आपला वडापाव आज सर्वत्र नेला आहे. ज्या विमानतळाच्या रस्त्यावर त्यांचे दुकान आहे, त्याच माार्गाने तो पुढे-मागे परदेशात जाण्यासाठी इच्छुक आहे. अश्या या नावाजलेल्या मुंबईतील बेस्ट वडापावची (पार्लेश्वर वडापाव सेंटर) चव एकदा नक्कीच चाखून पहा.

  
तुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात



• मुंबईत हरवलेला चाकरमानी आणि गाव

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या