महाराष्ट्र ग्रामपंचायत मतदार यादी | Maharashtra Grampanchayat Voters List संपूर्ण महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे. राज्यातील एकूण १४ हजार २३४ ग्रामपंचतच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत आणि १५ जानेवारी, २०२१ रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. याच निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अनेक उमेदवारांना किंवा मतदारांना प्रश्न असेल की, त्यांचं नाव मतदान यादीत आहे किंवा नाही? किंवा असेल तर कश्या पद्धतीने पाहता येऊ शकते. तुमच्या गावातील ग्रामपंचायत मतदार यादीतील तुमचे नाव तसेच ग्रामपंचायतची एकूण मतदारांची यादी तुम्ही मोबाईलनेही कशी पाहू शकता? ही माहिती या लेखातून पाहणार आहोत.
ऑनलाईन ग्रामपंचायत मतदार यादी कशी पहावी?
१. Gram panchayat voter list Maharashtra मोबाईल मध्ये कोणत्याही Browser वरून गूगल मध्ये जाऊन 'Online Voter List Maharashtra' किंवा 'ग्रामपंचायत मतदार यादी महाराष्ट्र' टाईप करून सर्च करावं.
२. शोध पूर्ण झाल्यावर सर्वात अगोदर आलेला परिणाम 'PDF Electoral Roll (Partwise) - Chief Electoral Officer, Maharashtra' या लिंकवर क्लीक करावे.
किंवा वेबसाईटसाठी थेट पुढील लिंकवर क्लीक करावे : https://ceo.maharashtra.gov.in/SearchList/
३. वेबसाईट उघडल्यावर सर्वप्रथम 'Select District' नुवडून तुमचा जिल्हा निवडावा.
४. 'Select Assembly Constituency' हा पर्याय निवडून तुमचा विधानसभा मतदार संघ निवडावा.
उदाहरण:
रत्नागिरी जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघ पुढील प्रमाणे:
२६३ - दापोली
२६४- गुहागर
२६५ - चिपळूण
२६६- रत्नागिरी
२६७- राजापूर
वरीलपैकी तुमचा विधानसभा सभा मतदार संघ निवडावा.
५. तुमचं गाव निवडावे
३. कॅपच्या अक्षरं टाईप करून Open Pdf वर क्लीक करावे.
त्यानंतर पिडीएफ स्वरूपातील तुमच्या ग्रामपंचायत मधील मतदानयादीची फाईल तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड होईल.
विधानसभा मतदारसंघाची २५ सप्टेंबर २०२० रोजी अस्तित्वात असलेली मतदार यादी या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यानुसार तयार करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या १ डिसेंबर २०२० रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या.
१५ जानेवारी, २०२१ रोजी निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या
ठाणे- १५८, पालघर- ३, रायगड- ८८, रत्नागिरी- ४७९, सिंधुदुर्ग- ७०, नाशिक- ६२१, धुळे- २१८, जळगाव- ७८३, अहमनगर- 767, नंदुरबार- 87, पुणे- 748, सोलापूर- ६५८, सातारा- ८७९, सांगली- १५२, कोल्हापूर- ४३३, औरंगाबाद- 618, बीड- 129, नांदेड- 1015, उस्मानाबाद- ४२८, परभणी- ५६६, जालना- ४७५, लातूर- ४०८, हिंगोली- ४९५, अमरावती- ५५३, अकोला- २२५, यवतमाळ- ९८०, वाशीम- १६३, बुलडाणा- ५२७, नागपूर- १३०, वर्धा- ५०, चंद्रपूर- ६२९, भंडारा- १४८, गोंदिया- १८९ आणि गडचिरोली- ३६२.
एकूण- १४,२३४.
ग्रामपंचायत मतदार यादी पाहण्यास काही अडचण येत असल्यास टिपण्णी करून कळवा आणि वरील माहिती आवडल्यास आपले मित्र परिवार आणि गावातील मंडळीं यांच्यासोबत नक्की शेअर करा.
तुम्हाला या पोस्ट आवडू शकतात
• ग्रामपंचायत निवडणूक निकाल 2021 पहा ऑनलाईन
• ग्रामपंचायत उमेदवारांची अंतिम यादी तसेच, उमेदवाराचे शपथपत्र व वैयक्तिक माहिती
1 टिप्पण्या
Rohini Mahendra Khandagle
उत्तर द्याहटवाआपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत.