सरपंच कर्तव्य व अधिकार Duty of Sarpanch in Marathi

 

सरपंच कर्तव्य व अधिकार Duty of Sarpanch in Marathi ग्रामपंचायतीच्या सरपंचांला लोकसेवक या नात्याने गावातील सर्व जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. गावाला समृद्ध करून विकासाच्या पथावर घेऊन जाण्याची जबादारी सरपंचावर असते. त्यानूसार शासनाने सरपंचाला इतर पदाधिकारींपेक्षा विशिष्ट अधिकार Rights of Sarpanch प्रदान केले आहेत. आणि त्या अधिकारांसोबत गावविकासाच्या दृष्टीने सरपंचाची कर्तव्य व जबाबदारीचा भारही शासनाने त्याच्यावर सोपविला आहे. त्याप्रमाणे तो ग्रामपंचायतीचा कार्यकारी प्रमुख म्हणून जबादारी पार पाडत असतो.


महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील कलम ३८ च्या कलमात सरपंचाचे अधिकार व कर्तव्ये यासंबंधी माहिती दिली आहे. तसेच, अधिननियमान्वये ग्रामसूचीत नमूद  केलेली कामे करण्याची जबाबदारी सरपंचाची असते.

सरपंच अधिकार व कर्तव्ये

• ग्रामपंचायतीच्या सभा बोलावणे व त्याचे अध्यक्षस्थान भूषविणे.

• ग्रामसभेत मंजूर झालेल्या ठरावांची अंमलबजावणी करणे.

• ग्रामपंचायतीच्या मालकीची मालमत्तेचं संरक्षण करणे.

• गावातील विविध गावसमीत्यांचे (तंटामुक्ती, ग्राम शिक्षण, पाणी पुरवठा व स्वच्छता समिती इत्यादी) अध्यक्षपद भूषविणे.

• ग्रामसभा व ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांच्या मदतीने नियोजन करून गावाचा विकास आराखडा, वार्षिक अंदाजपत्रक तयार करणे.

• ग्रामसभा व ग्रामपंचायतीच्या मदतीने सर्व योजनांची अंमलबजावणी करणे.


• ग्रामपंचायतीच्या कर्मचारी/नोकरवर्ग यांच्यावर देखरेख व नियंत्रण ठेवणे.

• ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे व सदस्यांचे प्रवास भत्ता व देयक मंजूर करण्याचे अधिकार सरपंचास असतात.

• ग्रामपंचायतीचे अभिलेख, नोंदवह्या यांची सुव्यवस्था व देखरेख ठेवणे.

• गावातील वंचित घटकांबाबत सकारात्मक दृष्टीकोन ठेवून त्यांना सहकार्य करणे.

• शासकीय योजनांचा लाभ वंचित, निराधार, विधवा, परित्यक्तता, अपंग व्यक्तींना मिळवुन देणे.

• महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखासंहिता २०११ नुसार आर्थिक व्यवहार करणे व त्यावर नियंत्रण ठेवणे.

• ग्रामपंचायतीकडे जमा करण्यात आलेल्या रकमा व त्यातून काढण्यात आलेले धनादेश याची सरपंच व ग्रामसेवकाची संयुक्त जबाबदारी असते.

• शासनाच्या कोणत्याही निर्देशाखाली देणे आवश्यक असतील अशी प्रमाणपत्रे, दाखले आपल्या सहीने आणि पंचायतीच्या मुद्रेनिशी देणे.

• ग्रामपंचायातील क्षेत्रातील प्राथमिक शाळांवर देखरेख ठेवणे.

• नेमणूक केलेल्या कर्मचारीला निलंबित, बडतर्फ करण्याचे अधिकार सरपंचास असतात.

• ग्रामपंचायत अधिनियमात प्रदान करण्यात आलेले अधिकार, तसेच पंचायतीकडे सोपवलेली कर्तव्य पार पाडण्यासाठी सरपंच हा पूर्णपणे जबाबदार असतो.

• आपली कर्तव्य योग्य रितीने पार पाडण्यासाठी आवश्यक असतील अशा कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यासाचे अधिकार सरपंचास असतात. त्यांचे वेतन ग्रामनिधीतून देण्यात येते.

हे देखील वाचा : ग्रामसभा - आमच्या गावात आम्हीच सरकार

ग्रामपंचायत ग्रामसुची

महाराष्ट्र अधिनियम ४५ मधील ग्रामसुचीनुसार सर्व कामे करण्याची जबाबदारी सरपंचाची असते. ग्रामसुचीमध्ये पुढीलप्रमाणे घटकांवर सरपंचाला काम करावयाचे असते- 

१) कृषी

२) पशुसंवर्धन

३) वने 

४) समाजकल्याण 

५) शिक्षण

६) वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य

७) इमारती व दळवळण

८) पाटबंधारे

९) उद्योग व कुटिर उद्योग

१०) स्वसंरक्षण व ग्रामसंरक्षण

११) सामान्य प्रशासन

हे देखील वाचा : ग्रामसेवकाची कर्तव्य व कामे


१) कृषी 

गावातील जमिन आणि इतर साधनसंपत्ती यांचे व्यवस्थापन करणे, पडीत जमीन लागवडीयोग्य करणे, सुधारित बी- बियाणांचे उत्पादन करण्याककरिता रोपमळ्यांची स्थापना करणे आणि सुधारीत बी-बियाण्यांच्या उपयोगास उत्तेजन देणे, पीक प्रयोग व पीक संरक्षण करणे व धान्य आगरे स्थापन करणे, मिश्र खत तयार करणे आणि खतांची विक्री करणे तसेच, खतांची साधनसंपत्ती सुरक्षित ठेवली जाईल याची जागा निश्चित करणे.

२) पशुसंवर्धन

गुरांची आणि त्यांच्या पैदाशीची सुधारणा करणे.

३) वने

ग्रामवने आणि गायराने निर्माण करणे, त्यांचे जतन करणे.

४) समाजकल्याण

अपंग, निराश्रित आणि आजारी व्यक्तींना सहाय्य देणे. तसेच, अस्पृश्यता निवारण, मागासवर्गीयांची स्थिती सुधारणे, जुगार, दारूबंदीला उत्तेजन देणे, भ्रष्टाचार निर्मुलन करणे.

५) शिक्षण

गावातील सक्षरतेचं प्रमाण वाढविणे, शिक्षणाचा प्रसार करणे व प्राथमिक शाळांच्या इमारतीचे परिरक्षण व दुरुस्ती करणे. शाळांकरिता सामग्री आणि क्रीडांगणे यांची वेळोवेळी जिल्हा परिषद/शासनाकडे तरतूद करणे. क्रीडा-सांस्कृतिक क्षेत्रातील उद्दिष्टे पार पाडणे. प्रौढ साक्षरता केंद्रे, ग्रंथालय व वाचनालये यांची व्यवस्था करणे.

६) वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य

वैद्यकीय सहाय्याची तरतूद करणे. प्रसूती आणि शिशु कल्याण बाबत जनजागृती करणे. सार्वजनिक आरोग्य रक्षण सुधारणा करणे, कोणत्याही संक्रांमक रोगाचा उद्रेक, फैलाव होण्यास प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना करणे.

माणसांना आणि प्राण्यांना लस टोचण्यास उत्तेजन देणे. सार्वजनिक रस्ते, नाल्या, बांध, तलाव व विहिरी आणि इतर सार्वजनिक जागा किंवा बांधकामे स्वच्छ करणे, कचऱ्याचे ढीग, माजलेले रान, काटेरी निवडुंग काढून टाकणे, वापरात नसलेल्या विहिरी, आरोग्यास अपायकारक तळी,  डबकी, खड्डे- खाचखळगे बुजवणे, सार्वजनिक शौचकूप बांधणे व ते सुस्थितीत राखणे, दहनभूमी व दफन भूमी यांची तरतुद करणे व त्या सुस्थितीत राखणे.

७) इमारती व दळणवळण

सार्वजनिक रस्ते, नाल्या, बांध व पूल बांधणे व ते वेळोवेळी दुरुस्ती करणे, रस्त्यांच्या बाजूस, बाजारांच्या जागेत व तसेच इतर सार्वजनिक जागांत झाडे लावणे व त्यांची जोपासना व रक्षण करणे, गावात दिवाबत्ती करणे.

८) पाट बंधारे

गावात आवश्यक असेल तेथे लहान पाट बंधारे बांधणे.

९) उद्योग व कुटीर उद्योग

रोजगाराच्या दृष्टीने गावात शेतीव्यवसाय, जोडधंदे, लघुउद्योग, कुटीर उद्योग व ग्रामोउद्योग यांना प्रोत्साहन देणे व त्यात सुधारणा करणे.


१०) स्वसरंक्षण व ग्रामसंरक्षण

गावात राखण व पहारा ठेवणे व गावात आग लागली असता जीवित व मालमत्ता यांचे संरक्षण करणे तसेच आग विझविण्यासाठी सहाय्य देणे.

११) सामान्य प्रशासन

गावातील कृषी उत्पन्न वाढविण्यासाठी कार्यक्रम आखणे, कोडंवाडे स्थापन करणे, त्यावर नियंत्रण ठेवणे व त्याचे व्यवस्थापन करणे, भटक्या व बेवारशी कुत्रांचा नाश करणे, बेवारशी गुरांची विल्हेवाट लावणे, पंचायतीच्या साफसफाई कर्मचारी वर्गासाठी घरे बांधणे व ती सुस्थितीत ठेवणे, जत्रा, यात्रा व उत्सव सुरू करणे व त्याची नियमितता ठेवणे व त्यावर नियंत्रण ठेवणे, टंचाईच्या काळात कामे सुरू करणे व ती चालू ठेवणे किंवा स्थानिक लोकांना रोजगार पुरविणे, रास्त भावाची दुकाने उघडणे.

हे देखील वाचा : राष्ट्रीय रोजगार हमी योजना (मनरेगा)

गावातील ज्या तक्रारी पंचायतीकडून दूर करण्याजोग्या नसतील त्या योग्य प्राधिकाऱ्यांना कळविणे, कोणत्याही प्रयोजनासाठी केंद्र सरकार किंवा राज्य शासनाने दिलेले सहाय्य ज्याच्यादारे गावापर्यंत पोहचू शकेल असे माध्यम म्हणून काम करणे इत्यादी जबाबदाऱ्या सरपंचाच्या असतात.

वाचकमित्रहो, सरपंच आणि ग्रामसेवक हे दोघेही शासनाचे तसेच, गावातील ग्रामपंचायतीचे मुख्य शासकीय अधिकारी म्हणून काम पाहत असतात. ग्रामसेवक सहसा गावातील लोकांना प्राप्त होत नाही. परंतू, सरपंच हा गावातील स्थानिक असल्याने, त्याला सतत ग्रामस्थांच्या प्रश्नांना थेट सामोरे जावं लागतं. शासनाने सरपंचाला वरचढ अधिकार आणि कर्तव्य सोपविली असली तरीही, ती योग्य रीतीने पार पाडण्यासाठी प्रसंगी सरपंचाला तारेवरची कसरत करावी लागते हे देखील तितकेच खरे! आपलं मत खाली टिपण्णी करून नक्की कळवा.

हे देखील वाचा : शिधापत्रिका तपासणी नमुना कसा भरायचा?

तुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात

शरद पवार ग्रामसमृद्धी योजना

• महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८

• माहितीचा अधिकार कसा वापरावा?

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

  1. ग्रामपंचायत सेवक,कर्मचारी यांचे कार्य, कर्तव्य,अधिकार याबाबत माहिती पोस्ट करावी..

    उत्तर द्याहटवा

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत.