पीएम गरीब कल्याण अन्न योजना मराठी PM Garib Kalyan Yojana 2021 In Marathi | PMGKY केंद्र शासनाच्या केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक पुरवठा विभागाच्या केलेल्या घोषणेनुसार देशात पीएम गरीब कल्याण अन्न योजना 2021 (PM Gareeb Kalyan Ann Yojana 2021) पुन्हा राबवावी असे निर्देश देण्यात आले आहेत. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (महाराष्ट्र) या योजनेंतर्गत नागरिकांना मोफत धान्य वाटप केले जाईल.
पीएम गरीब कल्याण अन्न योजना केंद्र शासनाकडून राज्य स्तरावर राबविण्यात जाणारी अन्नसुरक्षा योजना आहे. केंद्र सरकारने मागील वर्षाप्रमाणेच देशातील कोविड-१९ च्या उद्रेकामुळे उद्भवलेल्या आर्थिक अडचणींमुळे गरीब आणि गरजू लोकांना सामना कराव्या लागणाऱ्या हालअपेष्टा कमी करण्यासाठी केंद्र सरकारने पुढील २ महिने म्हणजेच, मे आणि जून २०२१ या कालावधीसाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा २०१३ अंतर्गत समावेश असणाऱ्या सुमारे ८० कोटी लाभार्थींना दरमहा माणसी ५ किलो मोफत धान्य वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. आधीच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने (PMGKY) च्या धर्तीवरच हे वाटप केले जाणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २३ एप्रिल २०२१ रोजी देशाला संबोधित करताना ही घोषणा केली.
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना नियम:
या विशेष योजनेअंतर्गत (PMGKY) अंत्योदय अन्न योजना (AAY) आणि प्राधान्य गृहकर्मी (Priority Household) या दोन्ही प्रवर्गांतर्गत सुमारे ८० कोटी एनएफएसए लाभार्थ्यांना, एनएफएसए च्या दरमहा नियमित मिळणाऱ्या धान्या व्यक्तिरिक्त दरमहा माणसी ५ किलो अतिरिक्त मोफत धान्य (तांदूळ/गहू) देण्यात येणार आहे.
प्रधानमंत्री गरीब कल्याण पैकेज:
अन्नधान्य अनुदान आणि आंतरराज्यीय वाहतुकीसाठी राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना केंद्रीय सहाय्य केल्यामुळे केंद्र सरकार यासाठी २६,००० कोटींपेक्षा (Pradhan Mantri Garib Kalyan Package) जास्त खर्च करणार आहे.
देशातील वाढत्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भामुळे हा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारने देशातील ८० कोटी लोकांना फायदा मिळावा म्हणून जगातील सर्वात मोठी अन्न सुरक्षा योजना मंजूर केली आहे. या योजनेंतर्गत, सर्व रेशनकार्डधारकांना सध्याच्या रेशनच्या व्यतिरिक्त ५ किलो प्रति व्यक्ती रेशन दिले जाईल, हे जास्तीचे धान्य किंवा रेशन देशवासीयांमध्ये मोफत दिले जाईल.
देश कोविड -१९ च्या दुसऱ्या लाटेसोबत लढाई करत असताना गरीब आणि गरजू लोकांच पोषण करणे ही शासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे मे आणि जून २०२१ या कालावधीसाठी प्रति व्यक्ती पाच किलो मोफत धान्य दिले जाईल. त्यासाठी २६ हजार कोटी पेक्षा जास्तची रक्कम खर्च करण्यात येईल. असे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करताना म्हणाले.
PMGKY मागील वर्षी राबविण्यात आली होती:
मागील २०२० या वर्षी कोविड - १९ या विषाणूचा प्रादुर्भाव देशभरात झाला असता, लॉकडाऊन घोषित झाला होता. त्यामुळे, २६ मार्च २०२० या दिवशी केंद्र शासनाने PMGKY पीएम गरीब कल्याण अन्न योजना देशात राबविण्याचे निर्देश दिले होते. त्याप्रमाणे देशभरातील लोकांनी या योजनेचा लाभ घेतला होता.
या योजने अंतर्गत PM Garib Kalyan Yojana 2021 रेशनकार्ड धारकांना, रेशन कार्डवर नाव असेलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या नावे पाच किलो गहू किंवा तांदूळ याचे वाटप करण्यात येईल. हे धान्य दरमहा मिळत असलेल्या धन्याच्या व्यतिरिक्त रेशन दुकानावर जास्तीचे भेटेल.
ऑनलाईन रेजिस्ट्रेशन pm garib kalyan anna yojana online application
पीएम गरीब कल्याण अन्न योजना ( Pradhanmantri Garib Kalyan Anna Yojana) योजनेअंतर्गत कोणतीही ऑनलाईन रेजिस्ट्रेशन प्रक्रिया pm garib kalyan yojana registration online apply करण्याची गरज नाही. लाभार्थी नियमितच्या रेशन दुकानावरून रेशकार्डद्वारे या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
हे देखील वाचा : पीएम किसान योजनेचा आठवा हप्ता
तुम्हाला या पोस्ट आवडू शकतात
• पीएम किसान योजनेचे नवीन नियम
• ग्रामसमृद्धी योजना महाराष्ट्र
0 टिप्पण्या
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत.