प्रधानमंत्री जन धन योजना मराठी माहिती PMJDY In Marathi देशातील प्रत्येक नागरिकांकडे किमान एक बँक खाते असावे, बँकिंग सुविधा उपलब्ध व्हावी व सरकारी योजनेचा आर्थिक लाभ लोकांना थेट बँक खात्यात जमा व्हावा तसेच, विमा संरक्षण (Insurance Protection) व इतर आर्थिक व्यवहार सुलभ होण्याच्या उद्देशाने दिनांक २८ ऑगस्ट, २०१४ ला प्रधानमंत्री जन धन योजना Pm Jan Dhan Yojana In Marathi संपूर्ण देशात राबविण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
प्रधानमंत्री जन धन ही योजना विशेषतः समाजातील गरीब आणि दुर्बल घटकांसाठी अतिशय लाभदायक योजना आहे. शून्य बॅलन्सवर बँक खाती उघडण्यासाठी आणि कर्ज आधारित, हस्तांतरण सुविधा, विमा आणि निवृत्तीवेतनाची सुविधा तसेच, बँकिंग / बचत, ठेवी खाते, रेमिटन्स, कर्ज, विमा, निवृत्तीवेतन इत्यादी आर्थिक सेवा या योजनेअंतर्गत सर्वांना प्रभावीपणे उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
तुमचे चालू असलेले कोणतंही बचत खातं जनधन खात्यात करण्यासाठी, बँकेत जाऊन एक फॉर्म भरावा लागेल. सोबतच आपल्या खात्यासाठी RuPay कार्डसाठी अर्ज करावा लागेल. दोन्ही फॉर्म बँकेत सबमिट केल्यानंतर बचत खातं जनधन खात्यात बदललं जातं.
प्रधानमंत्री जन धन योजनेचे फायदे/लाभ:
१) कोणत्याही बँकेमधून झिरो बॅलन्स बचत खाते उघडता येते म्हणजेच, किमान शिल्लक ठेवणे आवश्यक नाही.
२) खातेधारकाला निशुल्क मोबाईल बँकिंगची सुविधा मिळते.
२) बँकेतील ठेवींवरील व्याज मिळते.
३) लाभार्थीना रु. 2,00000/- ( दोन लाख रु. फक्त ) रुपयांचा अपघात विमा संरक्षण प्राप्त होते.
४) प्रधानमंत्री जन धन योजनेंतर्गत लाभार्थीच्या मृत्यूच्या सामान्य शर्तीची भरपाई केल्यास रु. 30,000/- ( तीस हजार रु. फक्त ) रुपयांचा जीवन विमा देण्यात येतो.
५) भारतभर निधी सहज हस्तांतरण (Easy Fund Transfer).
६) सरकारी योजनेतील लाभार्थ्यांना या खात्यांमधून थेट लाभ मिळेल.
७) सहा महिन्यांपर्यंत या खात्यांच्या समाधानकारक व्यवहार झाल्यास ओव्हरड्राफ्टची सुविधा दिली जाईल.
८) लाभार्थीच्या प्रति परिवाराला रु. 10,000/ - इतकी ओव्हरड्राफ्ट सुविधा प्रत्येक कुटुंबासाठी फक्त एका खात्यात उपलब्ध आहे, ही सुविधा मुख्यत: कुटुंबातील महिलांसाठी मिळते.
प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत ओवरड्राफ्ट सुविधा म्हणजे काय?
प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत ओवरड्राफ्ट सुविधा म्हणजे जनधन खातेधारक आपल्या खात्यातून 10 हजार रुपयांपर्यंत ओवरड्राफ्ट (Credit Facilty ) करु शकतो. म्हणजेच, खात्यात पैसे नसतानाही किंवा खात्यात शिल्लक असलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम काढता येते. त्या रक्कमेवर बँककडून व्याजदर आकारणी होते. परंतु ही सुविधा खातं सुरु केल्यानंतर काही महिन्यांनंतरच मिळते. (या योजनेअंतर्गत पूर्वी ५०००/- एवढी ओवरड्राफ्ट ची सुविधा होती).
प्रधानमंत्री जन धन योजना नियम मराठी:
१) भारतात राहणारा 10 वर्षांवरील कोणताही नागरिक जनधन खातं सुरु करु शकतो.
२) लाभार्थीचे बँकेत बचत खाते असणे आवश्यक आहे.
३) अपघात विमा संरक्षण फायदा उपलब्ध होण्यासाठी, रुपे कार्डचा वापर 45 दिवसातून एकदा तरी झाला पाहिजे.
४) जन धन योजना खात्यात कोणताही मिनिमम बॅलेन्स ठेवण्याची आवश्यकता नाही. परंतु, चेकबुकची सुविधा घेतल्यास मिनिमम बॅलेन्स ठेवणं गरजेचं आहे.
5) ओव्हरड्राफ्टची सुविधा प्राप्त करण्यासाठी सहा महिन्यापर्यंत समाधानकारक व्यवहार होणे आवश्यक असते.
प्रधानमंत्री जन धन योजनेंतर्गत खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:
जर आधार कार्ड / आधार नंबर उपलब्ध असेल तर इतर कागदपत्रांची आवश्यकता नाही. जर पत्ता बदलला असेल तर, सध्याच्या पत्त्याचे स्वयं-प्रमाणपत्र पुरेसे आहे. जर आधार कार्ड उपलब्ध नसेल तर खालीलपैकी कोणत्याही वैध कागदपत्रांची आवश्यकता असेलः
- मतदार ओळखपत्र
- ड्रायव्हिंग लायसन्स
- पॅनकार्ड, पासपोर्ट आणि नरेगा कार्ड
जन धन योजनेत निधी पाठविला:
या योजनेंतर्गत 1 एप्रिल 2020 पर्यंत देशातील गरीब महिलांच्या खात्यात 1.20 लाख कोटी रुपये जमा झाले. देशात लॉक-डाउनमुळे गरीब कुटुंबातील महिलांच्या जनधन खात्यात 500 रुपयांची रक्कम पाठविली जात होती. अधिकृत आकडेवारीनुसार, 8 जानेवारी 2020 रोजी संपलेल्या आठवड्यात पंतप्रधान जन धन योजनेंतर्गत उघडण्यात आलेल्या खात्यातील ठेवी 1.28 लाख कोटी रुपयांवर पोचल्या आहेत. 8 एप्रिल रोजी पंतप्रधानांच्या गरीब कल्याणकारी योजनांनी सुरू केलेल्या महिलांच्या 38.12 दशलक्षांच्या खात्यात 1,27,748.43 दशलक्ष रुपये जमा झाले, ज्यात जनधन खात्यांतील 9.86 दशलक्ष महिलांच्या खात्यात 9,930 कोटी रुपये जमा झाले.
प्रधानमंत्री जनधन योजनेबाबत वारंवार विचारले जाणारे प्रश्न:
प्रधानमंत्री जन धन योजना म्हणजे काय?
उत्तर: प्रधानमंत्री जनधन योजना म्हणजे बँकिंग वित्तीय सेवा उदा. बँकेचे आर्थिक व्यवहार, बचत आणि मुदत ठेव पैसे पाठवणे कर्ज व विमा पेन्शन जनतेला सुव्यवस्थित स्वरूपात सहज उपलब्ध करून देणे तसेच, ही योजना राष्ट्रीय पातळीवर आर्थिक व्यवहारात सर्वांचा समावेश व्हावा, यासाठी राबवलेली केंद्रपूरस्कृत योजना आहे.
प्रधानमंत्री जनधन खाते कसे काढायचे?
उत्तर: इच्छुक लाभार्थी ज्यांना प्रधानमंत्री जन धन योजना 2021 अंतर्गत बँकेत खाते उघडायचे आहे, त्यांनी त्यांच्या जवळच्या कोणत्याही बँकेच्या शाखेत जावे लागेल, बँकेत गेल्यानंतर तेथून जन धन खाते उघडण्यासाठी अर्ज मिळवावा लागेल. अर्जाचा फॉर्म घेतल्यानंतर तुम्हाला अर्जात भरलेल्या सर्व माहिती भराव्या लागतील. सर्व माहिती भरुन घेतल्यानंतर तुमची सर्व आवश्यक कागदपत्रे अर्ज अर्जासोबत भरावी लागतील आणि भरलेला अर्ज बँकेच्या अधिकाऱ्याकडे जमा करावा लागेल त्या नंतर प्रधानमंत्री जन धन योजनेचे बँक खाते काही दिवसात बँक अधिकाऱ्यांकडून उघडेल जाईल.
आर्थिक समावेशन योजना (स्वाभिमान) आणि प्रधानमंत्री जनधन योजना यात कोणता फरक आहे?
उत्तर: प्रधानमंत्री जनधन योजना (PMJDY) प्रत्येक परिवाराचा या योजनेत समावेश करण्यावर भर देते. यापूर्वीची योजना फक्त गाव-खेड्यांचा विचार करीत होती. प्रधानमंत्री जनधन ही योजना संपूर्ण ग्रामीण आणि शहरी भागाला सामाविष्ट करीत आहे आणि संपूर्ण देशभर उपलब्ध करून देण्यात आहे.
प्रधानमंत्री जनधन योजने अंतर्गत संयुक्त खाते (जॉइंट अकाउंट) उघडता येते काय?
उत्तर: होय, बँकेच्या शाखातून संयुक्त खाते (जॉइंट अकाउंट ) उघडता येते. व्यवसाय प्रतिनिधी यांच्या माध्यमातून मात्र एकाच व्यक्तीला खाते उघडता येईल.
प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत मी कोठे खाते उघडू शकतो?
उत्तर: बँकेच्या कोणत्याही शाखेत किंवा व्यवसाय प्रतिनिधी मार्फत हे खाते उघडता येते.
रूपे (Rupay) डेबिट कार्ड काय आहे?
उत्तर: रूपे डेबिट कार्ड Rupay Debit Card हे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांनी केलेले निवासी डेबिट कार्ड आहे. हे डेबिट कार्ड देशातील सर्व एटीएम केंद्रावर रोख रक्कम काढण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी चालू शकते.
पी.आय.एन. (PIN) क्रमांक म्हणजे काय?
उत्तर: एटीएम कार्डचा वापर करून खात्यातून रोख रक्कम काढण्यासाठी पी.ओ.एस मशीनद्वारा काही खरेदी करताना खातेदाराने स्वतः निर्माण केलेल्या कोड नंबर म्हणजे व्यक्तिगत ओळख क्रमांक (पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर) होय.
रुपे कार्डाचा (Rupay Card) विशेष फायदा कोणता?
उत्तर: रुपये कार्डधारकाला कोणताही चार्जेस न आकारता, रुपये एक लाखापर्यंत ची अपघात विमा सुविधा उपलब्ध करण्यात येते.
रूपे कार्ड डेबिट कार्ड कार्यरत राहण्यासाठी काय करावे?
उत्तर: अपघात विमा संरक्षण फायदा उपलब्ध होण्यासाठी, आपल्या रुपे कार्डचा वापर 45 दिवसातून एकदा तरी झाला पाहिजे.
प्रधानमंत्री जन धन योजना टोल फ्री नंबर:
प्रधानमंत्री जन धन योजनेबद्दल काही समस्या, तक्रार आणि माहिती हवी असल्यास राष्ट्रीय टोल फ्री क्रमांक 1800110001 आणि 18001801111 या क्रमांकावर संपर्क करता येतो. तसेच योजने बाबत अधिक माहिती हवी असल्यास योजनेच्या संकेतस्थळाला भेट द्या: https://pmjdy.gov.in
तुम्हाला या पोस्ट आवडू शकतात
• प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
• प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना
0 टिप्पण्या
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत.