नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना माहिती | Nanaji Krishi Sanjivani Yojana Marathi | पोकरा योजना माहिती | POCRA Maharashtra
POCRA - Nanaji Deshmukh Krishi Sanjivani Yojana in Marathi विदर्भ व मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त गावांमध्ये तसेच विदर्भातील पूर्णा नदीच्या खोऱ्यातील खारपाण पट्ट्यातील गावांमध्ये जागतिक बॅंकेच्या अर्थसाहाय्याने चार हजार कोटी अंदाजित खर्च नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प POCRA (पूर्वीचे नाव हवामान अनुकूल कृषी प्रकल्प) राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्याचप्रमाणे प्रकल्प मंजुरी पूर्व कामाकरिता प्रकल्प व्यवस्थापन कक्षाची मुंबई येथे स्थापना करण्यास आणि प्रकल्पाकरिता 805 पदांच्या आकृतिबंधात मंजुरी प्रदान करण्यात आलेली आहे. याद्वारे प्रकल्पाची जिल्हास्तर उपविभाग सर्व गाव समोर स्तरावर प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी प्रकल्पास लागणाऱ्या मनुष्य होण्याच्या दृष्टीने आवश्यक पदाची निर्मिती करण्यात आलेली आहे.
विदर्भ व मराठवाड्यातील पंधरा जिल्ह्यांमधील 5 हजार 142 गावांमध्ये सहा वर्षाच्या (2018 -19 ते 2023 - 24) कालावधीत प्रकल्प राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. 15 जिल्ह्यांमध्ये अकोला,अमरावती, औरंगाबाद, बीड, बुलढाणा, हिंगोली, जळगाव,जालना,लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ इत्यादी जिल्ह्याचा समावेश आहे. या प्रकल्पाअंतर्गत १५ जिल्ह्यांमधील हवामान बदलास अतिसंवेदनक्षम ठरणारी ४२१० गावे व पूर्णा नदीच्या खोऱ्यातील खारपाण पट्ट्यातील भूजल साक्षरतेची समस्या असेलेली ९३२ गावे, आशा एकूण ५१४२ गावांची निवड करण्यात आलेली आहे.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी Nanaji Deshmukh Krishi Sanjivani Yojana प्रकल्पांतर्गत गावपातळीवर हाती घ्यावयाच्या कामांचे सूक्ष्म नियोजन करून प्रकल्पाची अंमलबजावणी योग्य योग्यरित्या होण्याच्या उद्देशाने प्रकल्पांतर्गत निवडलेल्या गावांच्या ग्राम पंचायतीमध्ये ग्राम कृषी संजीवनी समिती Village Climate Resilience Agriculture Managment Committee VCRAMC स्थापन करण्यात आली आहे.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत राबविल्या जाणाऱ्या विविध योजना:
१. सेंद्रिय शेती Organic farming
२. फळबाग लागवड
३. वानिकी आधारित शेतीपद्धती -वृक्ष लागवड
४. मधुमक्षिका पालन
५. शेततळे / सामुदायिक शेततळे
६. पाणी उपसा साधने व पाईप
७. विहीर पुनर्भरण
८. रेशीम उद्योग
९. ठिबक व तुषार सिंचन
१०. नवीन पाणी साठवण संरचनांची निर्मिती-नवीन विहिरी
११. बंदिस्त शेळीपालन व परसातील कुक्कुट पालन
१२. भाडे तत्वावर कृषी अवजारे सेवा केंद्राची निर्मिती करणे
१. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत सेंद्रिय शेती योजना
सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये निसर्ग संवर्धन करणे, पीक उत्पादनाचा खर्च कमी करणे, रासायनिक खते कीटकनाशके, तणनाशके व संप्रेरके यांच्या सारख्या घातक रसायनांना पर्याय अशा सेंद्रिय व जैविक निविष्ठांचा वापर वाढविणे ही काळाची गरज आहे. गांडूळ खत किंवा व्हर्मी कंपोस्ट हे शेतातील काडीकचरा, वनस्पतिजन्य पदार्थ, शेण यांच्यापासून गांडूळद्वारे बनवले जाते. गांडूळ खतामध्ये विविध जिवाणू, संजीवके, विटॅमिन आणि इतर उपयुक्त रसायने गांडूळ खतामध्ये असल्याने त्याचा पिकाच्या वाढीवर चांगला परिणाम होतो.
याचबरोबर शेतातील कचऱ्यावर कंपोस्टिंग द्वारा प्रक्रिया केल्यास त्यातील सेंद्रिय पदार्थ जैविक पद्धतीने, सूक्ष्मजीव तसेच गांडूळद्वारे कुजवून त्याच्यापासून उत्तम प्रकारचे ह्युमस सारखे सेंद्रिय कंपोस्ट खत तयार होते. या खताचा वापर शेतात मोठ्या प्रमाणात केला गेलास, जमिनीचे आरोग्य विषयक सुधारणा होऊन कृषी उत्पादनात फार मोठी भर पडेल. शेतातून निघालेल्या सर्व वनस्पतिजन्य पदार्थपासून सेंद्रिय खत तयार करून परत शेतात टाकणे ही काळाची गरज आहे. सेंद्रिय खतांमुळे जमिनीचा कस व जलसंधारण शक्ती वाढून पोषक द्रव्यांचा पुरवठा योग्य प्रमाणात होतो. जमीन भुसभुशीत राहते त्यामुळे जमिनीत हवा खेळती राहते. शेतात उपयुक्त सूक्ष्मजीवांची वाढ होण्यास मदत होते. या अनुषंगाने सदरची बाब विचारात घेऊन गांडूळ खत उत्पादन युनिट आणि नाडेप कंपोस्ट खत उत्पादन युनिट व सेंद्रिय निविष्ठा उत्पादन युनिट हे वैयक्तिक लाभाचे घटक पोकरा योजने अंतर्गत राबविले जातात.
सेंद्रिय शेतीची उद्दिष्टे:
१. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये सामावेश करण्यात आलेल्या गाव समूहातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना हवामानबदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत जुळवून घेण्यास सक्षम बनवणे.
२. पॉस्टीक अन्नधान्याचे उत्पादन करणे.
३. नैसर्गिक घटकांना हानी न पोहोचविता त्यांचा योग्य वापर करून शेती करणे.
४. जमिनीची सुपिकता वाढवणे व ती दीर्घकाळ टिकवणे.
५. स्थानिक स्त्रोतांचा पुनर्रवापर शेतीमध्ये करणे.
६. शेतीचा उत्पादन खर्च कमी करून शेतकऱ्यांच्या निव्वळ उत्पादनात वाढ करणे.
सेंद्रिय शेती POCRA योजना लाभार्थी निवड निकष/ पात्रता,अर्थसहाय्य आणि मार्गदर्शक सूचना.pdf
२. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत फळबाग लागवड:
वातावरणातील कर्ब वायूचे वाढलेले प्रमाण हवामान बदलाशी निगडित असलेला महत्त्वाचा घटक आहे या कर्बवायूचे स्थिरीकरण करण्याच्या प्रक्रियेमुळे वृक्षांची फळबागांची लागवड अतिशय प्रभावी ठरते. शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नती बरोबरच हवामान बदलास कारणीभूत ठरणाऱ्या कर्ब वायूचे स्थिरीकरण करणे हाही या प्रकल्पाचा एक उद्देश आहे.
सदर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत प्रकल्प जिल्ह्यातील प्रथम टप्प्यातील निवडलेल्या गावांमध्ये फळबाग लागवड हा मंजूर घटक राबविण्यासाठी खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या गेल्या आहेत.
फळबाग लागवड सर्वसाधारण सूचना:
१. क्षेत्रीय पातळीवर कृषी विभागाचे अधिकारी/कर्मचारी यांना प्रकल्पाअंतर्गत सूचना प्रमाणे या प्रकल्प घटकाची अंमलबजावणी करावी.
२. फळ पिकांच्या लागवडीसाठी राज्याच्या भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा मार्गदर्शक सूचना सन 2018-19 नुसार अर्थसहाय्य अनुज्ञेय राहील. तथापी फळपिके निश्चित करताना राज्याच्या कृषी हवामान क्षेत्र अनुकूल असणाऱ्या फळांच्या व त्यांच्या प्रजातींच्या कलमांच्या लागवडीसाठी अर्थसाह्य देय राहील.
३. प्रकल्प अंतर्गत फळबाग लागवडीचा कालावधी माहे मे ते नोव्हेंबर असा राहील. सदर फळबाग लागवडीची व्यापक प्रसिद्धी देण्यासाठी प्रथम टप्प्यातील प्रकल्प गावांमध्ये भिंतीपत्रके, ग्रामपंचायतीच्या गावाच्या नोटीस बोर्डवर लावण्यात यावीत.
४. प्रकल्प अंतर्गत इच्छुक लाभार्थ्यांकडून प्रकल्प व्यवस्थापन कक्षाने निश्चित केलेल्या अनुदान मागणी अर्ज नमुनामध्ये संबंधित गावाचे ग्राम कृषी संजीवनी समितीकडे अर्ज मागविण्यात यावेत.
५. प्राप्त झालेल्या मागणी अर्जांपैकी पात्र शेतकऱ्यांमधून प्रकल्पाअंतर्गत लाभार्थी निवडीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार समितीनेच प्राधान्यक्रमाने लाभार्थी निवड करून यादी संबंधित उपविभागीय कृषी अधिकारी यांच्याकडे ठराव प्रतीसह सादर करावी.
६. प्रकल्पांतर्गत वृक्ष आधारित खालील बहुवार्षिक फळांच्या लागवडीसाठी तीन वर्ष कालावधीत प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षी अनुक्रमे 50% 30 % व 20 % या प्रमाणात अर्थसहाय्य अनुज्ञेय राहील.
७. योजनेअंतर्गत लागवडीसाठी पात्र फळपिके/कलमे: आंबा, डाळिंब, पेरू, सीताफळ, आवळा, कागदी लिंबू, संत्रा व मोसंबी.
फळबाग लागवड POCRA योजना लाभार्थी निवड निकष/ पात्रता, अर्थसहाय्य आणि मार्गदर्शक सूचना.pdf
३. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत वानिकी आधारित शेती पद्धती वृक्ष लागवड:
सदर प्रकल्प अंतर्गत वानिकी आधारित शेती पद्धती वृक्ष लागवड या घटकास प्राधान्य दिले आहे.
वानिकी आधारित शेती पद्धती वृक्ष लागवड याची उद्दिष्टे:
१. वातावरणातील कार्बन उत्सर्जनामुळे होणारे दुष्परिणाम कमी करण्यासाठी वृक्ष अच्छादन वाढवणे, जमिनीतील सेंद्रिय घटकांचे संवर्धन पीक पद्धतीतून उत्पादकता वाढवणे.
२. शेती पिकांना पूरक म्हणून शेतावर वृक्ष लागवडी खालील क्षेत्र वाढवणे.
३. शेती पद्धतीवर आधारित वृक्ष लागवडीखालील क्षेत्रात वाढ करून एकमेकांना पूरक व एकात्मिक पद्धतीने पिकांची, पशुधनाची उत्पादकता वाढवणे, रोजगाराच्या संधी, उत्पन्नाच्या संधी व ग्रामीण भागातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांचे राहणीमान सुधारण्यासाठी प्रोत्साहन देणे.
४. विविध कृषी पर्यावरणीय प्रदेश आणि जमीन वापराच्या परिस्थितीनुसार वनशेतीसाठी अनुकूल पद्धती / आदर्श पद्धती लोकप्रिय करणे.
५. शेती पद्धतीवर आधारित वृक्षलागवड क्षेत्राचा विस्तार व क्षमता बांधणीसाठी सहाय्य करणे.
वानिकी आधारित शेती पद्धती वृक्षलागवडीच्या प्रमुख बाबी:
शेतकऱ्यांच्या वैयक्तिक क्षेत्रावर वानिकी आधारित शेतीपद्धती वृक्षलागवड या घटकांतर्गत खालील बाबींचा समावेश आहे.
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वनवृक्ष उदाहरण साग, मोह, जांभूळ, खैर, शिवन, बेहडा, धावडा इत्यादी स्थानिक कृषी हवामान अनुकूल असणाऱ्या वृक्ष प्रजातींची लागवड करणे अपेक्षित आहे.
४. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत मधुमक्षिका पालन:
मधमाशांची पालन व्यवस्थित केले आणि त्यापासून मिळणाऱ्या मत एकत्रित करून तो बाटल्यात भरून घेतला तर एक एकर शेतात ठेवलेल्या मधमाशांच्या पिठातून वर्षाकाठी 50 हजार ते 60 हजार रुपयांचा मध जमा होऊ शकतो. मध हे एक शक्तिदायक, पौष्टिक अन्न व औषध आहे. मधमाशांचे मेण हे सौंदर्य प्रसाधने तसेच औद्योगिक उत्पादनाचा घटक आहे. केवळ मध व मेणासाठीच नव्हे तर मधमाश्यांकडून होणाऱ्या परागीकरण यामुळे उत्पादनात चांगल्या प्रमाणात वाढ होते.
त्यामुळे प्रकल्प क्षेत्रांमध्ये मधुमक्षिका पालन याद्वारे शेतकऱ्यांना पूरक उत्पन्न मिळवून देण्यासाठी तसेच ग्रामीण भागात रोजगार निर्मिती होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत मधुमक्षिकापालन या घटकाचा समावेश करण्यात आलेला आहे.
मधुमक्षिका पालन उद्दिष्टे:
१. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात समावेश करण्यात आलेला गाव समूहात मधुमक्षिका पालन या घटकांतर्गत मधुमक्षिका पालनाद्वारे भूमीहीन व्यक्ती/शेतकऱ्यांना पूरक उत्पन्न मिळवून देणे.
२. ग्रामीण भागातील मधुमक्षिका पालन व्यवसायास चालना मिळावी व आहारामध्ये मधाचा समावेश व्हावा.
मधुमक्षिका पालन POCRA योजना लाभार्थी निवड निकष/ पात्रता, अर्थसहाय्य आणि मार्गदर्शक सूचना.pdf
५. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत शेततळे/सामुदायिक शेततळे:
राज्यातील पर्जन्यावर आधारित कोरडवाहू शेतीची पाणलोट व जलसंधारणाच्या माध्यमातून उत्पादकता वाढविण्यासाठी विविध योजनांमधून अनुदानावर शेततळे योजना राबवण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकर्यांची उत्पादन व उत्पन्नात वाढ होऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली आहे. सद्यस्थितीत राज्यातील टंचाईग्रस्त परिस्थिती पाहता शेतकऱ्यांकडे पिकास संरक्षण देण्याकरिता व्यवस्था निर्माण करण्यासाठी जागतिक बँक अर्थसहाय्यीत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत जलसंवर्धनासाठी नवीन संरचनेचे बांधकाम व वैयक्तिक शेततळे, सामुदायिक शेततळे, शेत तळ्यांची साठवण क्षमता वाढविणे इत्यादी सामुदायिक व वैयक्तिक लाभाच्या शेततळे योजना राबवली जाते.
शेततळे/सामुदायिक शेततळे उद्दिष्टे:
१. प्रकल्पांतर्गत निवडलेल्या गाव समूहा मधील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना हवामानबदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत जुळवून घेण्यास सक्षम बनवणे.
२. संरक्षित सिंचनाची सुविधा निर्माण करणे.
३. दुबार पिकाखालील क्षेत्र वाढवणे व शेतकर्यांच्या उत्पन्नात वाढ करणे.
शेततळे/सामुदायिक शेततळे POCRA योजना लाभार्थी निवड निकष/पात्रता, अर्थसहाय्य आणि मार्गदर्शक सूचना.pdf
६. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत पाणी उपसा साधने व पाईप:
मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांना गेल्या काही वर्षांपासून मोठ्या दुष्कळास सामोरे जावे लागत असून भूभर्गातील पाणीसाठ्यावर व जमिनीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. परिणामी शेतीतील पिकांची उत्पादन क्षमता घटत आहे. तसेच पूर्णा नदीच्या खोऱ्यातील भू -भाग हा निसर्गतः क्षारपड असल्याने शेतीसाठी सिंचनास मर्यादा येत आहेत.
यामुळे, राज्यातील पर्जन्यावर आधारित कोरडवाहू शेतीची संरक्षित सिंचनाच्या माध्यमातून उत्पादकता वाढविण्यासाठी यापूर्वी विविध योजनांमधून अनुदानावर सिंचन सुविधा राबिविण्यात आल्या. सद्यस्थितीती राज्यातील टंचाईग्रस्त परिस्थिती पाहता व शेतकर्यांकडे पिकास सिंचन देणेकरिता व्यवस्था निर्माण करण्यासाठी जागतिक बँक अर्थसहाय्यीत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पनांतर्गत संरक्षित सिंचनाकरिता पाण्याची उपलबद्धता या उपघटकापर्यंत पाणी उपसा साधने (पंप संच) व पाईप हे वैयक्तीक लाभाचे घटक राबविले जातात.
पाणी उपसा साधने व पाईप उद्दिष्टे:
१. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये समावेश करण्यात आलेल्या गावसमूहातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकर्यांना हवामान बदलामुळे उदभवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास सक्षम बनविणे.
२. पाणी उपसा साधनांचा वापर करून सिंचनाची सोय करणे व कार्यक्षमता वाढविणे.
पाणी उपसा साधने व पाईप POCRA योजना लाभार्थी निवड निकष/पात्रता,अर्थसहाय्य आणि मार्गदर्शक सूचना.pdf
७. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत विहीर पुनर्भरण:
जमिनीवरील पाण्याचा साठा व भूजलसाठा हे दोन्ही साठे प्रामुख्याने पावसावरच अवलंबून आहेत. पाऊसमान चांगले असल्यास जमिनीवरील पाणीसाठे उदा. धरणे, शेततळी, तलाव, इत्यादी. तसेच पाणी जिरल्यामुळे भुजलसाठ्यात वाढ होते. लोकसंख्या वाढ, शहरीकरण, औदयोगिकरण, जमीन व पाण्याचे आरोग्य व्यवस्थापन पाणी वापरासंबंधी साक्षरतेचा अभाव, जास्त पाणी लागणाऱ्या पिकांखाली क्षेत्रात होत असेलेली वाढ, भूजल पुनर्भरणासाठीचे अपुरे प्रयत्न, नैर्सगिकरीत्याही भूजल पुनर्भरण कमी होणे, दुष्काळी परिस्थितीमुळे भूजलाची वाढलेली मागणी या व अश्या कारणांमुळे भूजल पातळी खोल गेलेली आहे. ज्या प्रमाणात भूजलाचा उपसा करण्यात येत आहे. भूजल पातळी वाढण्यासाठी पावसाचे पाणी जिथे जिथे शक्य आहे त्या ठिकाणी जिरविण्याचे प्रयत्न करणे आवश्यक आहे.
विहिरी पुनर्भरण उद्दिष्टे:
१. कृषी क्षेत्रात सिंचनासाठी अस्तित्वात असलेल्या विहिरीचे पुनर्भरण करून भूजलाच्या स्थितीत वाढ करणे.
२. दुःष्काळग्रस्त भागामध्ये जास्तीचा पाणी साठा जतन करणे व लोकांची सामाजिक व आर्थिक स्थिती सुधारणे.
विहीर पुनर्भरण POCRA योजना लाभार्थी निवड निकष/ पात्रता, अर्थसहाय्य आणि मार्गदर्शक सूचना.pdf
८. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत रेशीम उद्योग:
रेशीम उद्योग हा कृषी व वन संपत्तीवर आधारित उद्योग असून यामध्ये रोजगाराची मोठी क्षमता आहे. प्रकल्पाअंतर्गत निवड झालेल्या क्षेत्रामध्ये या उद्योगास पोषक वातावरण असल्याने रेशीम उत्पदना करण्यास भरपूर वाव आहे. कृषी विकास बरोबरोबरच ग्रामीण भागातील जनतेचे जीवनमान उंचावण्यास मदत करणारा हा उद्योग आहे.
केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून रेशीम उद्योगास प्रोत्साहन देण्यात येत असूनही राज्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणत या उद्योगाकडे वळलेले दिसून येत नाहीत. म्हणूनच रेशीम उद्योगाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी या घटकाचा समावेश नानाजी देशमुख संजीवनी प्रकल्पांतर्गत करण्यात आलेला आहे.
रेशीम उद्योग प्रकल्पाची उद्दिष्टे:
१. रेशीम उद्योगाच्या माध्यमातून प्रकल्पांतर्गत समाविष्ट गावसमूहातील शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाचे साधन निमार्ण करून उत्पन्नात वाढ करणे.
२. रेशीम उद्योगाचा समूह आधारित सर्वांगीण विकास करणे.
३. तुती उत्पादन व रेशीम उद्योगात महिलांचा सहभाग वाढविणे.
४. नावीन्यपूर्ण योजनेची व्यापक प्रसिद्धी देऊन शेतकऱ्यांना या उद्योगासाठी प्रोत्साहित करणे.
रेशीम उद्योग POCRA योजना लाभार्थी निवड निकष/पात्रता, अर्थसहाय्य आणि मार्गदर्शक सूचना.pdf
९. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत ठिबक व तुषार सिंचन:
केंद्र शासनाने सन २०१७-१८ मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना - प्रती थेंब अधिक पीक ( per drop more crop ) केन्द्र आणि राज्य शासनाने सूक्ष्म सिंचन राबविण्यासाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत. सदर योजनेच्या धर्तीवर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत सूक्ष्म सिंचन योजना (ठिबक व तुषार सिंचन) राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे.
ठिबक व तुषार सिंचन प्रकल्पाची उद्दिष्टे:
१. प्रकल्पाअंतर्गत जिल्हांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सूक्ष्म सिंचनाखाली क्षेत्रात वाढ करणे.
२. आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कृषी व फलोत्पादन पिकांचा विकास करण्यासाठी सिंचन पद्धतीस चालना देणे.
३. कृषी उत्पादन, कृषी उत्पादनाची गुणवत्ता आणि पर्यायाने शेतकऱ्यांच्या एकूण उत्पन्नात वाढ करणे.
४. जलवापर कार्यक्षमतेत वाढ करणे.
ठिबक व तुषार सिंचन POCRA योजना लाभार्थी निवड निकष/ पात्रता, अर्थसहाय्य आणि मार्गदर्शक सूचना.pdf
१०. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत नवीन पाणी साठवण संरचनांची निर्मिती - नवीन विहिरी:
राज्यातील पर्जन्यावर आधारित कोरडवाहू शेती क्षेत्रामध्ये संरक्षित सिंचनाकरिता प्रामुख्याने विहिरीद्वारे पाण्याची उपलबध्दता करून घेतली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन व उत्पन्नात वाढ होऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवण्यास मदत झाली आहे. सद्यस्थितीत राज्यातील टंचाईग्रस्त परिस्थिती पाहता व शेतकर्यांकडे पिकास सिंचन देणेकरिता व्यवस्था निर्माण करण्यासाठी जागतिक बँक अर्थसहाय्यीत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पअंतर्गत नवीन पाणी साठवण संरचना निर्मिती या उपघटकांतर्गत विहीर हा घटक वैयक्तिक लाभाच्या घटकांमध्ये समाविष्ट केलेला आहे.
नवीन पाणी साठवण संरचनांची निर्मिती - नवीन विहिरी प्रकल्प उद्देश:
१. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये समावेश करण्यात आलेल्या गावसमूहातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना हवामान बदलामुळे उदभवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास सक्षम बनविणे.
२. संरक्षित सिंचनाची सोय निर्मण करणे व पीक उत्पादन वाढविणे.
११. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत बंदिस्त शेळीपालन व परसातील कुक्कुट पालन:
गावसमूहातील लोकांचा रोजगारनिर्मिती होऊन त्यांचे जीवनमान उंचवावे. त्याबरोबरोबर शेतीला पूरक असे असणारे बंदीस्त शेळीपालन व परसातील कुक्कुटपालन चालना मिळावी म्हणून नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत शेळीपालन व कुकुटपालन उद्योगास मान्यता मिळाली आहे.
भूमीहीन कुटुंबातील व्यक्ती तलाठी यांच्याकडील उपलब्ध अभिलेख व इच्छुक लाभार्थीयांनी दिलेले स्वयंघोषणा पत्र याआधारे ग्रामसुची संजीवनी समितीने लाभार्थी निवडीबाबत निर्णय द्यावयाचा असतो. यामध्ये विधवा व परित्यक्ता महिलांना सदर घटकांचा प्राधान्याने लाभ मिळतो.
१२. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत भाडे तत्वावर कृषी अवजारे सेवा केंद्राची निर्मिती करणे:
शेतीमध्ये विविध कामांसाठी वापरली जाणारी सर्व अवजारे खरेदी करणे अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी शक्य नसते. उत्पदकता वाढविण्यासाठी वेळेवर आणि अचूक कामे होणे आवश्यक असते. हे शक्य करण्यासाठी शेती यंत्रे महत्वाची भूमिका बजावतात. नोंदणीकृत शेतकरी गट / बचत गट शेतकरी उत्पादन संघ/कंपनी यांना कृषि अवजारे, उपकरणे व संयंत्रे अनुदानावर उपलब्ध करून देऊन शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी अनके अवजारे गरजेनुसार भाडे तत्वावर देण्याच्या उद्देशाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत कृषी अवजारे सेवा केंद्राची निर्मिती करणे या उपघटकांतर्गत अवजारे खरेदी करणे व ते ठेवण्यासाठी आवश्यक आकाराचे शेड बांधकाम या बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे.
भाडे तत्वावर कृषी अवजारे सेवा केंद्राची निर्मिती करणे प्रकल्पाचा उद्देश:
१. भाडे तत्वावर कृषी अवजारे सेवांसाठी फार्म मशिनरी बँका स्थापन करणे.
२. छोट्या शेतकऱ्यांना कृषी अवजारांच्या उच्च किमतीमुळे उदभवणाऱ्या समस्येवर मत करण्यासाठी कृषी अवजारे सेवा केंद्राची निर्मिंती करणे.
३. अत्यल्प व अल्प भूधारक शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवर यांत्रिकीकरणाची पोहच वाढविणे.
४. हाय -टेक आणि उच्च मूल्य शेती उपकरणांची सेवा अत्यल्प व अल्प भूधारक शेतकऱ्यांना वाजवी दरात उपलबध करून देणे.
५. पीक उत्पादनामध्ये सुधारित/नव्याने विकसित शेतीविषयक उपकरणांच्या वापरास प्रोत्साहन देऊन कार्यक्षमता व उत्पादनाचा दर्जा वाढविणे.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना इतर माहिती:
पोकरा वेबसाईट Pocra Website:
mahapocra.gov.in
पोकरा ई -मेल Pocra e-mail :
mahapocra@gmail.com
pmu@mahapocra.gov.in
हेल्पलाईन क्रमांक POCRA contact number:
022-49150800
022-22163351
तुम्हाला या पोस्ट आवडू शकतात
0 टिप्पण्या
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत.