पी एम किसान ट्रॅक्टर योजना 2021 PM Kisan Tractor Yojana Maharashtra

 

पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना | पी एम किसान ट्रॅक्टर योजना 2021 | PM Kisan Tractor Yojana Maharashtra | Tractor Subsidy in Maharashtra 2021 | ट्रॅक्टर अनुदान महाराष्ट्र 2021

भारत हा कृषीप्रधान देश असला तरी आजही देशातील बहुतेक शेतकऱ्यांना कृषीविषयक अनेक समस्यांना सामोरे जावं लागते. देशातील बरेच शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्यामुळे त्यांना शेती करण्यास आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळत नाही. असे शेतकरी शेतीची आधुनिक यंत्र सामग्री खरेदी करण्यास असमर्थ असतात. अर्थातच, त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर देखील याचे परिणाम दिसून येतात. या सर्व बाबी लक्षात घेऊन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू केलेली 'पी एम किसान ट्रॅक्टर योजना 2021' Pm Kisan Tractor Yojana 2021 ही एक कृषी यांत्रिकीकरण योजना आहे.

पंतप्रधान ट्रॅक्टर योजना | पी एम किसान ट्रॅक्टर योजना 2021 | PM Kisan Tractor Yojana Maharashtra | पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना | Tractor Subsidy in Maharashtra 2021 | ट्रॅक्टर अनुदान महाराष्ट्र 2021

सद्यस्थितीत, 'पी एम किसान ट्रॅक्टर योजना 2021' खरोखर अस्तित्वात आहे की नाही याबाबत अनेक शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. योनजेनेची संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी लेख पूर्ण वाचा.

केंद्र व राज्य पुरस्कृत असलेली Pradhan Mantri Kisan Tractor Yojana Maharashtra 2021 ही शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी २० ते ५० टक्के अनुदान देणारी योजना आहे. देशातील सर्व शेतकऱ्यांना आधुनिक शेतीची ओळख करून देणे आणि त्यांना परवडणाऱ्या किंमतीत शेतीची साधने उपलब्ध करून देणे हे या योजनेचे मुख्य उद्दीष्ट आहे.

पी एम किसान ट्रॅक्टर योजना 2021 (PM tractor yojana) या योजनेमुळे देशातील शेतकऱ्यांना स्वावलंबी आणि सक्षम बनविण्यासाठी मदत होईल. कारण आधुनिक शेती अधिक  सुलभ आणि कमी वेळ घेणारी आहे. कृषी व कर्ज विषयक विविध योजनांच्या मदतीने शेतकर्‍यांना मदत मिळेल आणि ते त्यांच्या परिस्थितीत सुधारणा होऊन त्यांचे उत्पन्नमध्ये वाढ होईल.

पी एम किसान ट्रॅक्टर 2021 (PM kisan tractor scheme) योजनेअंतर्गत शेतकरी कोणत्याही कंपनीचे ट्रॅक्टर घेऊ शकतात. महाराष्ट्र राज्यासाठी शेतकऱ्यांना ट्रॅक्टर घेण्यासाठी ५० टक्के रक्कम भरावी लागते व उर्वरित रक्कम केंद्र सरकार (Central Government) भरत असते. अनेक राज्य सरकार आपापल्या स्तरावर शेतकऱ्यांना ट्रॅक्टरवर २० ते ५० टक्के अनुदान देते. महाराष्ट्रमध्ये सद्यस्थितीत कृषी यांत्रिकरण, कृषी उन्नती योजना, राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना अशा विविध कृषी योजनेअंतर्गत ट्रॅक्टर  व कृषी अवजारे शेतकऱ्यांना अनुदानावर दिले जातात.

पी एम किसान ट्रॅक्टर अनुदान 2021 महाराष्ट्र | Tractor Subsidy in Maharashtra 2021:

पी एम किसान ट्रॅक्टर अनुदान 2021 महाराष्ट्र राज्यासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अल्प व अत्यअल्प भूधारक आणि महिला शेतकऱ्यांना किमतीच्या ५० टक्के किंवा रु. १.२५ लाख यापैकी कमी असेल ते आणि इतर शेतकऱ्यांना ट्रॅक्टर किमतीच्या ४० टक्के किंवा रु. १ लाख जे कमी असेल याप्रमाणे अनुदान tractor subsidy in maharashtra 2021 अनुज्ञेय राहील.

पी एम किसान ट्रॅक्टर योजना 2021 ठळक मुद्दे/वैशिष्ट्ये:

• पीएम किसान ट्रॅक्टर योजनेसाठी देशातील महिला शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य दिले जाईल.

• या योजनेंतर्गत नवीन ट्रॅक्टरवर शेतकऱ्यांना दिले जाणारे अनुदान थेट लाभार्थीच्या बँक खात्यात जमा केले जाईल.

• अर्जदाराच्या स्वतःच्या नावे शेतजमीन असणे आवश्यक असते.

पी एम किसान ट्रॅक्टर योजना 2021 निकष/पात्रता:

• अर्जदाराचे वय १८ ते ६० वर्षे असावे.

• लाभार्थी भारतीय नागरिक असावा.

• शेतकरी इतर कोणत्याही राज्य किंवा केंद्र सरकारच्या ट्रॅक्टर योजनेअंतर्गत अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा.

• पी एम किसान ट्रॅक्टर योजनेसाठी  (ट्रॅक्टर अनुदान महाराष्ट्र 2021) प्रति कुटुंब फक्त एकच सदस्य अर्ज करू शकतो.

• लागवडीयोग्य जमीन शेतकऱ्याच्या नावावर असावी.

पी एम किसान ट्रॅक्टर योजना 2021 आवश्यक कागदपत्रे:

• बँक खाते पासबुक

• जमिनीची कागदपत्रे (७/१२)

• रहिवासी पुरावा (आधार कार्ड)

• ओळख पत्र (मतदार कार्ड, पॅन कार्ड).


पी एम किसान ट्रॅक्टर योजना 2021 ऑनलाईन अर्ज | PM Kisan Tractor Yojana 2021 Online Apply:

पी एम किसान ट्रॅक्टर योजना 2021 योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येतो. PM tractor yojana online registration ऑनलाईन अर्ज करण्यासाठी प्रत्येक राज्याची स्वतंत्र वेबसाईट आहे त्यावर भेट देऊन अर्ज करता येतो. किंवा पात्र शेतकरी कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) द्वारे ऑनलाईन अर्ज करू शकतात. ही योजना केंद्रामार्फत राबवली जात असली तरीही योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्ज मात्र राज्य शासनाकडे करावा लागतो.

पी एम किसान ट्रॅक्टर योजना 2021 महाराष्ट्र राज्यासाठी पात्र शेतकरी आवश्यक कागदपत्रांसह खालीलप्रमाणे महाराष्ट्र राज्याच्या mahadbt.gov.in farmer login या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करु शकता. mahadbt portal वर अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांची नोंदणी व लाभार्थ्यांचे बँक खाते आधारशी जोडले गेले असावे लागते.

१. सर्वप्रथम https://mahadbtmahait.gov.in/ या संकेतस्थळावर यूजर नेम आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा. 

२. त्यानंतर 'सुचवेलेले पात्र योजना' या पर्यायामध्ये 'अर्ज करा' हा पर्याय निवडा/क्लिक करा.

३. यानंतर विविध योजनांची यादी पहायला मिळेल त्यापैकी 'कृषी यांत्रिकिरण' मध्ये 'बाबी निवडा' हा पर्याय निवडा.

४. यापुढे एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तालुका, गाव आणि इतर बाबी यांची माहीती भरा आणि खाली 'जतन करा' या पर्यायावर क्लिक करा.

५. त्यानंतर, पुन्हा 'मुख्यपुष्ठ/होमपेज' मध्ये जाऊन, वरील बाजूस 'अर्ज सादर करा' हा पर्याय निवडा.

६. यानंतर तुम्ही जतन केलेला तपशील पहायला मिळेल, तो योग्य असल्याची खात्री करून, पुन्हा 'अर्ज सादर करा' हा पर्याय निवडा.

७. त्यानंतर, 'Make Payment' हा पर्याय निवडून, अर्जाची प्रोसससिंग फी भरा (रु.२३.६०/-).

यानंतर डाव्या बाजूस मी 'अर्ज केलेल्या बाबी' या पर्यायामध्ये तुमच्या अर्जाचा मागोवा घेत रहा. राज्य शासनमार्फत लॉटरी सिस्टिमद्वारे लाभार्थ्यांची निवड केली जाते. निवड झाल्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.

अशा प्रकारे तुम्ही पी एम किसान ट्रॅक्टर योजना 2021 (पंतप्रधान ट्रॅक्टर योजना) साठी ऑनलाईन अर्ज PM Kisan Tractor Yojana 2021 Online Apply करू शकता.

पी एम किसान ट्रॅक्टर योजना 2021 बाबत महत्वाची सूचना:

प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजना 2021 ही खरोखरच अस्तित्वात आहे की नाही याबाबत राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या पत्रानुसार 'प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजना' अशा नावाची कोणतीही योजना अस्तित्वात नाही किंवा याबाबत कोणत्याही सूचना केंद्र सरकारमार्फत प्राप्त झाल्या नाहीत. मात्र, सन २०२०-२१ अंतर्गत महाराष्ट्र राज्यामध्ये केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण अभियान आणि एकात्मिक विकास अभियान या योजनाअंतर्गत ट्रॅक्टर खरेदीसाठी महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना अनुदान अनुज्ञेय आहे. या कृषी यांत्रिकीकरण अभियान बाबतची माहितीच आपण वरील लेखात पाहिली.

कृषी यांत्रिकीकरण अभियानाच्या संदर्भात दिनांक १४ जुलै, २०२० च्या शासन निर्णयानुसार ट्रॅक्टरसाठी अनुदानाचे दर घोषित करण्यात आले आहेत. त्यानुसार, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अल्प व अत्यअल्प भूधारक आणि महिला शेतकऱ्यांना किमतीच्या ५० टक्के किंवा रु. १.२५ लाख यापैकी कमी असेल ते आणि इतर शेतकऱ्यांना ट्रॅक्टर किमतीच्या ४० टक्के किंवा रु. १ लाख जे कमी असेल याप्रमाणे अनुदान अनुज्ञेय राहील.

ट्रॅक्टर अनुदान मिळवण्यासाठी (ट्रॅक्टर अनुदान महाराष्ट्र 2021 Tractor Subsidy in Maharashtra 2021) शासनाच्या https://mahadbtmahait.gov.in या पोर्टलवर अर्ज स्वीकारण्यात येत असून ऑनलाईन लॉटरी पद्धतीने जेष्ठता क्रमवारी निश्चित करून उपलब्ध निधीच्या प्रमाणात पूर्वसंमती देण्यात येणार आहे. पूर्वसंमती प्राप्त झाल्यानंतर ट्रॅक्टर खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांनाच अनुदानाचा लाभ देण्यात येणार आहे.

तुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना २०२१

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना २०२१

घरकुल योजना यादी महाराष्ट्र २०२१

प्रधानमंत्री जनधन योजना माहिती

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत.