कमवा आणि शिका योजना kamva ani shika yojana in marathi


कमवा आणि शिका योजना | kamva shika yojana । kamva v shika yojana pune । कमवा आणि शिका योजना माहिती । कमवा आणि शिका योजना पुणे विद्यापीठ । कमवा आणि शिका योजना सातारा

Learn and Earn Scheme in Maharashtra कर्मवीर भाऊराव पाटील यांनी महाराष्ट्रात रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि त्याचबरोबर ग्रामीण भागातल्या गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय केली. परंतु बरेच गरीब विद्यार्थी दरिद्री रेषेखालील, मागासवर्गीय असल्यामुळे शिक्षण घेऊ शकत नसत. अशा विद्यार्थ्यांसाठी कर्मवीरांनी 'कमवा आणि शिका' ही योजना (Education Yojana) सर्वप्रथम सातारा येथे सुरू केली. या योजनेला 'कर्मवीर भाऊराव पाटील योजना' (Karmaveer Bhaurao Patil Yojana) असंही म्हणतात.

शिका आणि शिकवा योजना | kamva shika yojana । kamva v shika yojana pune । कमवा आणि शिका योजना माहिती । कमवा आणि शिका योजना पुणे विद्यापीठ । कमवा आणि शिका योजना सातारा

महाविद्यालयीन आणि विद्यापीठात उच्च शिक्षण घेण्याऱ्या विद्यार्थ्यांला अध्ययन, अध्यापन व संशोधन एवढ्यापुरते मर्यादित न ठेवता, त्यांना संस्कृतीने वाढवावे हा शिक्षणाची मुळ दृष्टीकोन आहे. उच्च शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांवर श्रम संस्काराचाही वर्षाव व्हावा, त्यांनी हा ठेवा निरंतर जपावा या हेतूने 'कमवा आणि शिका योजना' सुरू करण्यात आली. कालानंतरने ही योजना राज्यातील विविध महाविद्यालयात लोकप्रिय झाली.

सद्यस्थितीत राज्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ पुणे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर अशा विद्यापीठामार्फत यशस्वीपणे राबवली जात असून राज्यभरातील अनेक विद्यार्थी या (Kamva ani Shika yojana) योजनेचा लाभ घेत आहेत.

कमवा आणि शिका योजनेची वैशिष्ट्ये:

• ही योजना विद्यापीठ स्तरावर पदव्यत्तर विभागासाठी व महाविद्यालयीन स्तरावर पदवी विभागासाठी राबवली जाते.

• आर्थिकदृष्टया दुर्बल, गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण संपादन करण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे.

• मानवी श्रमाची प्रतिष्ठा विद्यार्थ्यांमार्फत जोपासली जावी यासाठी प्रयत्न करणे.

• स्वयं रोजगाराच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना प्रवृत्त करणे.

• विद्यार्थ्यांना ज्ञान सेवक (Knowledge Servent) बनविणे.

• श्रम संस्कृतीची (Work Culture) जाणीव निर्माण करणे.

• विविध प्रकारची कामे करुन मिळणाऱ्या अनुभवाचा लाभ विद्यार्थ्यांना कमवा आणि शिका या योजनेअंतर्गत होऊ शकेल.

कमवा व शिका योजनेचे इतर नियम:

• जे विद्यार्थी गरीब परंतु हुशार व होतकरू आहेत अशा विद्यार्थांना या योजनेत प्रवेश दिला जातो.

• विद्यार्थ्यांची निवड सल्लागार समितीद्वारे करण्यात येते.

• विद्यार्थ्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रु. १ लाख पेक्षा जास्त नसावे.

• ज्या विद्यार्थांना भारत सरकारची शिष्यवृत्ती किंवा तत्सम शिष्यवृत्ती राज्य शासनाकडून मिळते अशा विद्यार्थांना प्राधान्य दिले जात नाही. अशा विद्यार्थांना जागा   रिक्त असल्यास सल्लागार समितीच्या निर्णयानुसार प्रवेश दिला जातो.

• ग्रामीण आदिवासी भाग, अनुसुचित जाती जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना समाविष्ट करणाऱ्या महाविद्यालय अनुक्रमे ९०% व १००% रक्कम दिली जाते.

• इतर घटकांसाठी विद्यापीठाच्या वतीने ७५ टक्के आर्थिक सहाय्य दिले जाते व उर्वरित २५ टक्के खर्च महाविद्यालयाला करावा लागतो.

कमवा आणि शिका योजना पात्रात/निकष:

कमवा आणि शिका ही योजना राज्यातील विद्यापीठे व विविध पदव्युत्तर शैक्षणिक विभागांमधुन पदवी अथवा पदव्युत्तर वर्गात उच्च शिक्षण घेणाऱ्या नियमित (Regular) विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी लागू राहील. या योजनेची अंमलबजावणी संबंधीत संलग्न महाविद्यालयामार्फत केली जाते.  महाविद्यालयास 'कमवा आणि शिका' योजना कार्यात्वित करण्यासाठी विद्यापीठाची मान्यता घेणे दरवर्षी अनिवार्य असेल. जी महाविद्यालये सरद योजनेच्या मार्गदर्शक तत्वांचा योग्य वापर करुन, योजना प्रभावीपणे राबवतील अशा महाविद्यालयांना पूढील वर्षी प्राधान्य देण्यात येते. राज्यातील अनेक विद्यापीठात व महाविद्यलयात ही रोजना राबिवली जात आहे. 

कमवा आणि शिका योजना अर्ज करण्याची पद्धत:

१. सदर योजना महाविद्यालयात/विद्यापीठाच्या पदव्युत्तर शैक्षणिक विभागात राबविण्यास मान्यता देण्याबाबतचे अधिकार मा. संचालक विद्यार्थी विकास यांना असतात.

२. मान्यता प्राप्त करण्यासाठी विशिष्ट नमुन्यात 'संचालक विद्यार्थी विकास” यांचे कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करणे आवश्‍यक आहे.

३. 'कमवा आणि शिका' योजनेच्या प्रवेशा संदर्भातील सूचना महाविद्यालयाच्या सुचनाफळकावर लावून तसेच प्रत्येक वर्गामध्ये सूचना देवून विहीत नमुन्यात अर्ज सादर करण्यासाठी आवाहन द्यावयाचे असते.


कमवा आणि शिका योजनेअंतर्गत करावयाची कामे:

भाऊराव कर्मवीर पाटील योजनेमध्ये (कमवा आणि शिका) सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी खालील नमूद केलेली कामे करावयाची असतात. परंतू स्थानिक परिस्थितीनुसार सल्लागार समितीच्या मान्यतेने इतरही कामांचा समावेश महाविद्यालयाची गरज लक्षात घेवून करता येतो.

कार्यालयीन कामे - प्रशासकीय विभाग, ग्रंथालय, प्रयोगशाळा व अन्य विभागातील कामे, इत्यादी.

तांत्रिक कामे - संगणकावरील कामे, झेरॉक्स मशीन, टेलिफोन बूथ चालविणे, इत्यादी. 

फील्ड वर्क - बागेची निगा राखणे, परिसरातील झाडांची निगा राखणे, खेळांची मैदाने तयार करणे व त्याची निगा राखणे, परिसर स्वच्छता करणे, गांडुळखत प्रकल्प बनविणे, नर्सरी युनिट तयार करणे, इत्यादी.

कमवा आणि शिका योजना कामाचे तास:

१. विद्यार्थ्याला प्रत्येक दिवशी जास्तीत जास्त तीन तास कार्यालयीन काम देता येईल.

२. ज्या दिवशी कार्यालयात सुट्टी असेल त्या दिवशी कार्यालयीन काम बंद असेल व हजेरी पत्रकावर विद्यार्थ्यांच्या गैरहजेरीची नोंद घेण्यात येईल.

३. विद्यार्थ्याला जास्तीत जास्त तीन तास फील्ड वर्क देता येईल कार्यालयाला सुट्टी असेल त्या दिवशीही फोल्ड वर्क करता येईल.

कमवा आणि शिका योजना कामाचा दर व (मानधन) देण्याची पद्धत:

१. योजनेतील काम करणाऱ्या विद्यार्थ्याला त्यांनी केलेल्या कामाचा मोबदला म्हणून कामाच्या प्रती तासाला रु.४५ या प्रमाणे मानधन देण्यात येते.

२. विद्यापीठाच्या अधिकार मंडळाने विद्यार्थ्यांना द्यावयाच्या मानधरात कोणताही बदल/ सुधारणा केल्यास महाविद्यालयांना कळविण्यात येईल.

३. प्रत्येक महिन्यात त्यांनी केलेल्या कामाच्या एकुण तासाची गणना करुन त्याला देय असलेली मानधनाची  एकुण धनादेशाद्वारे विद्यार्थ्याच्या बँक खात्यावर रक्‍कम जमा करण्यात येते.

४. धनादेश दिल्यानंतर विद्यार्थ्याच्या नावासमोर हजेरी पत्रकावर धनादेश क्रमांक नमूद केला जातो व धनादेश मिळाल्याची विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घेतली जाते. ही योजना राबविणाच्या महाविद्यालयाने या योजनेकरिता स्वतंत्र बँक खाते उघडणे आवश्यक आहे व ते खाते प्राचार्य आणि विद्यार्थी कल्याण अधिकारी यांचे संयुक्त स्वाक्षरीने चालविण्यात येते.

कमवा आणि शिका योजना हजेरी पत्रक:

१. सदर योजनेमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्याच्या यादीनुसार विद्यार्थ्यांचे मासिक हजेरपत्रक तयार केले जाते. 

२. हजेरी पत्रकावर विद्यापीठाने दिलेल्या विहित  नमुन्याप्रमाणेच असावे लागते.

३. हजेरीपत्रकामध्ये प्रत्येक दिवशी काम केल्याचे एकुण तास, कामाचा मोबादला, कामाचे स्वरुप व स्वाक्षरी असणे अनिर्वाय आहे.

४. गैरहजर असलेल्या दिवशी 'X' चिन्ह असावे.

५. हजेरी पत्रकावर कोठेही उपस्थिती अथवा अनुपस्थितीबाबत अनुकमे P किंवा A नमूद केलेले नसावे.

६. हजेरी पत्रकाच्या खाली विद्यार्थी कल्याण अधिकारी व प्राचार्यांची स्वाक्षरी असणे आवश्यक आहे.

वार्षिक हिशेब सादर करण्याची पद्धत:

१. प्रत्येक शैक्षणिक वर्षाच्या फेब्रुवारी अखेरपर्यंत ही योजना महाविद्यालयाने राबवायची असते.

२. Kamva ani Shika yojana योजनेचे सर्व हिशेब शैक्षणिक वर्षाच्या १० मार्च पर्यंत पुर्ण करावयाचे असतात.

हिशेब तपासणीच्या वेळी खालील कागदपत्रे सादर करावे लागते:

अ) कमवा व शिका योजनेच्या चालु शैक्षणिक वर्षातील मान्यतापत्राची प्रत. 

ब) कामाचा तपशिलवार वार्षिक अहवाल.

क) योजनेसाठी निवड झालेल्या विद्याथ्यांची यादी प्राचार्यांच्या स्वाक्षरीसह.

ड) विद्यार्थांचे मासिक हजेरीपट.

ह) विद्यार्थ्यांची मानधन दिलेली देयके, धनादेश क्रमांकासह, महाविद्यालयाचे बँक पासबुक.

फ) खर्चाचे विनियोग प्रमाणपत्र व विवरणपत्रांवर सनदी लेखापाल, विद्यार्थी कल्याण अधिकारी व प्राचार्य यांची स्वाक्षरी व शिक्का आवश्यक आहे.

तुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात

 • प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना महाराष्ट्र



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या