जीवन ज्योती विमा योजना Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana Marathi

 

जीवन ज्योती विमा योजना | पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना | प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना | पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना माहिती | PMJJBY in marathi | Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana Marathi

पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना ही एक अत्यंत कमी प्रीमियममध्ये विमा संरक्षण पुरवणारी आयुर्विमा योजना आहे. योजनेअंतर्गत, विमाधारकाला प्रतिदिवस रु.१ रुपयांपेक्षाही कमी प्रीमियममध्ये दोन लाखांचे विमा संरक्षण देण्यात येते. योजनेअंतर्गत विमाधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या अवलंबितास/वारसदाराला (नॉमिनी) रु. २ लाख इतकी रक्कम मिळते.

जीवन ज्योती विमा योजना | पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना | प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना | पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना माहिती | PMJJBY in marathi | Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana Marathi

भारतामध्ये केवळ २०% लोकांकडे जीवन विमा पॉलिसी (Life Insurance Policy) आहे. उर्वरित ८०% लोकं असे आहेत, जे महागडया पॉलिसीचे प्रीमियम भरणे शक्य होत नाही. अशा लोकांसाठी मे, २०१५ मध्ये प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना भारत शासनाकडून सुरु करण्यात आली. 

जीवन ज्योती विमा योजना प्रीमियम:

जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत अर्जदारास रु.३३०/- प्रतिवर्ष एवढा विम्याचा हप्ता (प्रीमियम), 'ऑटो-डेबिट' या बँकेच्या सुविधेच्या माध्यमातून प्रत्येक वार्षिक कव्हरेजचा कालावधी ३१ मे किंवा त्या अगोदर कमी केला जाईल. अर्जदाराने त्या कालावधीत प्रीमियमची रक्कम बँकेत शिल्लक ठेवणे आवश्यक आहे.

जीवन ज्योती विमा योजना ठळक वैशिष्ट्ये:

१. एका वर्षाचं प्रीमियम आणि एका वर्षाचं कव्हरेज, प्रत्येक वर्षाच्या १ जून ते ३१ मे च्या कालावधीमध्ये विमा संरक्षण विमाधारकाला दिले जाते. योजनेअंतर्गत कोणतेही मॅचुअरटी बेनिफिट दिले जात नाहीत.

२. विमाधारक व्यक्तीला जोखमीचं संरक्षण त्याच्या/ तिच्या वयाच्या पूर्ण १८ वर्षांपासून ५५ वर्षांपर्यंत दिलं जातं.

३. कोणत्याही कारणवश जसे की, बँक खात्यात पुरेशी रक्कम जमा नसणे, बँक किंवा प्रशासकीय त्रुटीमुळे बंद झालेली विमा पॉलसी, स्वस्थ आरोग्याविषयी विश्वासजनक खात्री दिल्यास अशी विमा पॉलिसी पुन्हा चालू करता येऊ शकते.

४. पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) भारतीय जीवन विमा निगम (LIC) च्या माध्यमातून किंवा इतर कोणत्याही विमा कंपन्यांच्यामार्फत राबवली जाते.

जीवन ज्योती विमा योजना पात्रता:

प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही जास्त अतिरीक्त अटींची पूर्तता करावी लागत नाही. मात्र, अर्जदार १८ ते ५० वयोगटातील भारतीय नागरिक असावा तसेच, त्याचे स्वतःच्या नावे कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे गरजेचे आहे. बँकेत आधार कार्डसहीत प्राथमिक केवाईसी KYC केलेली असावी. तसेच, विमाधारकाने विमाच्या बँकेतून दरवर्षी विम्याचा हफ्ता म्हणून ठराविक रक्कम बँक खात्यातून स्वयं-डेबिट व्हावी अशी बँकेला मान्यता देणे आवश्यक आहे.

विमा संरक्षण रु. २ लाख रुपये १ जून ते ३१ मे या एका वर्षाच्या कालावधीसाठी असेल आणि त्याचे दरवर्षी नूतनीकरण करणे आवश्यक असेल. या योजनेअंतर्गत जोखीम कव्हरेज रु. कोणत्याही कारणाने विमाधारकाचा मृत्यू झाल्यास 2 लाख. प्रीमियम रु. ३३०/- प्रतिवर्ष जे योजनेअंतर्गत प्रत्येक वार्षिक कव्हरेज कालावधीच्या ३१ मे रोजी किंवा त्यापूर्वी ग्राहकाच्या बँक खात्यातून एका हप्त्यात स्वयं-डेबिट AUTO-DEBIT केले जातील.


जीवन ज्योती विमा योजनेची समाप्ती:

अर्जदाराने सुरु केलेल्या जीवन ज्योती विमा योजनेची समाप्ती खालीलपैकी परिस्थितीमध्ये होऊ शकते. अशा परिस्थितीत कोणत्याही प्रकारचा लाभ विमाधारक व्यक्तीस मिळत नाही.

१. विमाधारकाचे वय ५५ होईपर्यंत प्रत्येक वर्षी योजनेची नूतनीकरण झाले नसल्यास, योजनेचे लाभ संपुष्टात येतील.

२. विमाधारकाचे योजनेशी संलग्न असलेले बँक खाते बंद झाल्यास किंवा प्रीमियमची रक्कम बँक खात्यात शिल्लक नसल्यास.

३. एखाद्या व्यक्तीने/विमाधारकाने प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत एकापेक्षा अधिक आयुर्विमा कंपनीकडून विमा कव्हरेज घेत असल्याचे आढळलले असल्यास, त्या व्यक्तीचे विमा संरक्षण बंद होऊन, प्रीमियम जप्त करण्यात येतो.

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना दावा पूर्तता करण्याची प्रक्रिया:

खालील प्रक्रियांच्या माध्यमातुन संबंधित विमा कंपनीच्या नियुक्त अधिकाऱ्याकडून रु. २,००,००० (रुपये दोन लाख) विमाधारकाच्या मृत्यूपश्चात दावा लाभ दिला जातो.

वारसदारने पुढील गोष्टींची पूर्तता करावी लागते:

१. विमा धारकाला पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत ज्या बँकेच्या 'बचत बँक खात्यातून' विमा संरक्षण मिळाले होते, त्या बँकेला वारसदाराने संपर्क साधावा, सोबत विमाधारकाचे मृत्यू प्रमाणपत्र घेऊन जावे.

२. वारसदाराने बँकेकडून किंवा निर्धारित विमा कंपनीची शाखा,  विमा प्रतिनिधी निर्धारित वेबसाइट इत्यादी ठिकाणाहून दाव्याचा फॉर्म, डिस्चार्ज पावती घ्यावी, विमा कंपनी फॉर्मची मोठ्या प्रमाणावर सुनिश्‍चित करेल. सदर फॉर्म इथून डाउनलोड करू शकता.

३. वारसदाराने संपूर्ण भरलेला दाव्याचा फॉर्म, डिस्चार्ज पावती, मृत्यू प्रमाणपत्र आणि वारसदाराच्या बँक खात्याची कॅन्सल केलेल्या चेकची प्रत (जर असेल तर) सादर करावी किंवा सदस्याला (प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा) योजनेअंतर्गत ज्या बँकेच्या 'बचत बँक खात्यातून' विमा संरक्षण मिळालं त्या बँकेचा तपशील द्यावा.

जीवन ज्योती विमा योजना दावा लाभ देण्यासाठी बँकेची कार्यपध्दती:

१. विमा धारकाची मृत्यूची माहिती मिळताच बँक ह्याची तपासणी करेल की मृत्यूवेळी सदर विमा धारकाचे विमा संरक्षण कार्यरत होतं का? म्हणजेच, सदर विम्याचा वार्षिक नुतनीकरण हप्ता भरण्याच्या तारखेला म्हणजेच, १ जूनला भरला होत का? विमाधारकाच्या मृत्यूआथी त्याच्या खात्यातून पैसे काढून संबंधित विमा कंपनीकडे जमा झाले होते का? इत्यादी गोष्टींची पडताळणी केली जाते.

 २. बँक उपलब्ध नोंदीमधून दाव्याचा फॉर्म आणि वारसदाराचा तपशील तपासून पाहील आणि दाव्याच्या फॉर्ममधील संबंधित रकाने भरून काढेल.

३. संबंधित विमा कंपनीच्या नियुक्त कार्यालयामध्ये बँक खालील कागदपत्रे सादर करेल:

अ) संपूर्ण भरलेला दाव्याचा फॉर्म

ब) मृत्यू प्रमाणपत्र

क) डिस्चार्ज पावती

ड) वारसदाराच्या कॅन्सल केलेल्या चेकची झेराक्स प्रत (जर असेल तर)

४. विमा कंपनीला संपूर्ण भरलेला दाव्याचा फॉर्म पाठवण्यासाठी बँकेला दावा दाखल झाल्यापासून तीस दिवसांचा कमाल कालावधी दिला जातो.

विमा कंपनीच्या अधिकाऱ्याने करायची कार्यवाही:

१. दाव्याचा फार्म सर्व प्रकारे पूर्ण असल्याची आणि सर्व संबंधित कागदपत्रे जोडली असल्याची खात्री करेल. जर नसतील तर बँकेशी संपर्क करेल.

२. जर दावा स्वीकारार्ह असेल तर विमाकर्त्याचा नियुक्त अधिकारी सदस्याचा विमा चालू स्थितीत होता का आणि इतर कोणत्याही खात्यातून सदस्याला मृत्यूपश्चात दावा देय करण्यात आलेला नाही हे तपासेल. जर कोणताही दावा पूर्ण करण्यात आला असेल तर वारसदाराला कळवण्यात येईल आणि एक प्रत बँकेला सादर करण्यात येईल.

३. जर विमा चालू स्थितीत असेल आणि सदर सदस्यासाठी कोणताही दावा पूर्ण करण्यात आलेला नसेल तर वारसदाराच्या बँक खात्यात पैसे भरण्यात येतील आणि त्याची माहिती वारसदाराला देण्यात येईल आणि एक प्रत बँकेला सादर केली जाईल.

४. विमा कंपनीसाठी दावा मंजूर करण्याचा आणि पैसे देण्याचा कमाल कालावधी बँकेकडून दावा प्राप्त झाल्यानंतर तीस दिवस असतो.

जर दावाकर्त्याने विमा कंपनीच्या कोणत्याही कार्यालयात थेट दाव्याचा फॉर्म सादर केला तर विमा कंपनी, सदर दावा ज्या बँकेत ज्या मृत व्यक्तीचं खातं होतं तिथे पाठवेल आणि आवश्यक तपासणी  आणि इत्यादी करून घेईल. संबंधित बँकेची शाखा दाव्याचा फॉर्म, दाव्यावर कार्यवाही होण्यासाठी विमा कंपनीच्या नियुक्त अधिकाऱ्याकडे पाठवतो.

प्रधान मंत्री जीवन ज्योति विमा योजना फॉर्म PDF:

प्रधान मंत्री जीवन ज्योति बीमा योजना फॉर्म मराठी PDF - डाऊनलोड करा.

प्रधान मंत्री जीवन ज्योती बीमा योजना दावा फॉर्म PDF - डाऊनलोड करा.

जीवन ज्योती विमा योजना टोल फ्री क्रमांक:

महाराष्ट्रासाठीचा टोल फ्री क्र. १८००-१०२-२६३६

राष्ट्रीय टोल फ्री क्र. : १८००-१८०-११११ आणि १८००-११०-००१

संकेतस्थळ: https://www.jansuraksha.gov.in/

वाचकमित्रहो, सध्याच्या जागतिक महामारीच्या काळात प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना इतर खर्चिक विमा पॉलिसीपेक्षा अधिक स्वस्त आणि विश्वासजनक पॉलीसी आहे. जास्तीती-जास्त लोकांपर्यंत ही माहिती शेअर करा.

तुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात

पंतप्रधान सुरक्षा विमा योजना

पंतप्रधान मुद्रा योजना

महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या