Annasaheb Patil Arthik Vikas Mahamandal Yojana | अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज योजना | अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज योजना कागदपत्रे | अण्णासाहेब पाटील कर्ज योजना माहिती | अण्णासाहेब पाटील कर्जासाठी ऑनलाइन अर्ज करा | अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना माहिती pdf | Udyog mahaswayam gov in | Annasaheb Patil Loan documents List | अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मर्यादित
महाराष्ट्र शासनाच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाद्वारे महाराष्ट्रातील मराठा तरुणांना नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी किंवा सुरु असलेला व्यवसायाची वाढ करण्यासाठी रुपये १० लाख पर्यंत बिनव्याजी कर्ज पुरवठा करण्यात येतो. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाद्वारे (Annasaheb Patil Arthik Vikas Mahamandal) खालील योजना राबिवल्या जातात.
१) वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना
२) गट कर्ज व्याज परतावा योजना
३) गट प्रकल्प कर्ज योजना
वरीलपैकी, 'वैयक्तिक कर्ज व्याज परतावा' या योजनेबद्दल सविस्तर माहिती सदर लेखात पाहणार आहोत.
अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज योजना उद्देश:
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत मराठा समाजातील नव उद्योजकांना मदतीचा हात देण्यासाठी बँकतर्फे स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी किंवा वाढविण्यासाठी कर्ज पुरविले जाते. त्या कर्ज रक्ममेवरील व्याज परतावा हा आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत केला जातो. म्हणजेज, लाभार्थास बिनव्याजी कर्ज उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज योजना सुरु करण्यात आली.
अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज योजना लाभ:
नॉन क्रिमिलेअर करिता (ज्या कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न रु. ८ लाख पेक्षा कमी असणारे व्क्ती) असलेल्या कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादेत असलेल्या व्यक्तीला रुपये १० लाख पर्यंत कर्ज मंजूर केले जाते. हे कर्ज मंजूर झाल्यानंतर व लाभार्थीने वेळेत कर्जाचे हफ्ते भरल्यास, त्यातील व्याजाची रक्कम (१२ टक्के च्या मर्यदित) लाभार्थीच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा थेट जमा करण्यात येते.
या योजनेकरिता करिता एकूण प्रस्तावित निधीच्या किमान ४ टक्के निधी दिव्यांगांसाठी राखीव ठेवण्यात येते.
अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज योजना पात्रता:
१. लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असावा.
२. लाभार्थी वयोगट मर्यादा पुरुषांसाठी ५० तर महिलांसाठी ५५ वर्ष एवढे असावे.
३. लाभार्थीने महामंडळाच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
४. दिव्यांगाकरिता, दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक.
५. एका व्यक्तीला केवळ एका योजनेचा लाभ घेता येऊ शकतो.
६. बँक खाते आधारकार्ड सोबत लिंक केलेले असावे.
७. महामंडळाच्या ऑनलाईन वेबपोर्टलवर नाव नोंदणी केलेली असावी.
८. लाभार्थी कोणत्याही बँकेचा/वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा.
अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज योजना ठळक मुद्दे:
१. लाभार्थी प्रकल्पाचे क्षेत्र पूर्णतः महाराष्ट्र राज्यातील असावे. त्यामध्ये, कृषी लघु व मध्यम उद्योग, उत्पादन, व्यापार व विक्री आणि सेवा क्षेत्रे असावीत.
२. एका व्यक्तीला केवळ एकदाच या योजनेचा लाभ घेता येतो.
३. या योजनेअंतर्गत एकाच कुटूंबातील ( रक्त नाते संबंधातील ) व्यक्ती कर्जाकरीता सहकर्जदार राहीले असतील, तर अशा प्रकरणांना देखील महामंडळ मंजूरी देत आहे. परंतू अर्जदाराचे नाव प्रथम कर्जदार म्हणून असणे आवश्यक असेल.
४. जर लाभार्थीने मध्येच नियमित कर्ज परतफेड केली नाही तर व्याज परतावा दिला जात नाही.
५. या योजनेअंतर्गत, महामंडळ लाभार्थ्यांना पहिला हफ्ता (मुद्दल + व्याज) अनुदान स्वरुपात अदा करेल. तसेच त्या व्यतिरिक्त जास्तीत जास्त ३ लाखापर्यंत (१२ टक्क्यांच्या मर्यादेत) कर्ज व्याज परतावा करेल. म्हणजेच प्रत्येक लाभार्थ्याला जास्तीत-जास्त रु. ३ लाखापर्यंत व्याज परतावा देण्यात येईल.
६. कर्ज देणाऱ्या बँकेच्या नियमानुसार व्याजाची रक्कम बँकेत भरणा केल्यानंतर, एक-रकमी स्वरुपात महामंडळ हे लाभार्थ्याच्या आधारलिंक कर्ज खात्यामध्ये व्याजाची रक्कम जमा करेल. हा परतावा प्रत्येक महिन्याला वेळेवर हफ्ता परतफेड केल्यास देण्यात येईल.
अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज योजना कागदपत्रे:
अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज योजनेसाठी ऑनलाईन रेजिस्ट्रेशन (नाव नोंदणी) करण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक असतात. Annasaheb Patil Loan documents List.
१) आधार कार्ड
२) रेशनकार्ड
३) पॅन कार्ड
४) उत्पन्न दाखला (वार्षिक उत्पन्न ८ लाख पर्यंत आवश्यक)
५) जातीचा दाखला
६) प्रकल्प अहवाल
ऑनलाईन रेजिस्ट्रेशन केल्यानंतर, प्रत्यक्ष बँकेतून कर्ज घेताना सादर करावयाची कागदपत्रे:
१. आधार कार्ड
२. मतदार कार्ड / पण कार्ड / वीज बिल
३. उद्योग आधार / शॉप ऍक्ट लायसन्स
४. बँक खाते / स्टेटमेंट
५. सिबिल रिपोर्ट
६. व्यवसाय प्रकल्प अहवाल
७. व्यवसायातील प्रशिक्षण प्रमाणपत्र
बँकेतून कर्ज मंजूर झाल्यानंतर, व्याज परताव्यासाठी अर्जदाराने महामंडळास (ऑनलाईन) सादर करावयाची कागदपत्रे:
१. बँक कर्ज मंजुरी पत्र
२. लोन खाते बँक स्टेटमेंट
३. उद्योग आधार / शॉप ऍक्ट लायसन्स
४. व्यवसाय प्रकल्प अहवाल
५. व्यवसायाचा फोटो
अण्णासाहेब पाटील कर्जासाठी ऑनलाइन अर्ज करा:
• लाभार्थीने सर्वप्रथम Udyog mahaswayam gov in या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन नाव नोंदणी करावी लागते व त्यानंतर ऑनलाईन अर्ज सादर करणे बंधनकारक असते. अर्ज सादर केल्यानंतर लाभार्थास सशर्त ऑनलाईन हेतू पत्र (Letter of Intent) दिले जाते. या पत्राच्या आधारे लाभार्थीने बँकेकडे कर्ज मंजूर करून घ्यावे.
• अर्जदाराने महामंडळाच्या वेब पोर्टलवर नोंदणी करते वेळीस, आधारलिंक मोबाईलवर OTP द्वारे, मोबाईल ॲप द्वारे नोंदणी करावयाची असते. यासाठी सध्याचा वापरात असलेला मोबाईल नंबर, आधार क्रमांकासोबत अद्यावत ( LINK ) करावा, कारण नोंदणी करताना सदरचा OTP नमूद केल्याशिवाय नोंदणी प्रक्रीया पूर्ण होऊ शकत नाही.
• अर्जकर्त्याने अटी व शर्ती मंजूर असल्याबाबतचे शपथपत्र ऑनलाईन फॉरमॅटमध्ये भरून, आवश्यक कागदपत्रे अपलोड करावयाची आहेत.
• लाभार्थ्याने व्यवसाय सुरु केलेनंतर सहा महिन्यामध्ये त्याच्या व्यवसायाचे दोन फोटो अपलोड करावयाचे आहेत.
अण्णासाहेब पाटील कर्जासाठी ऑनलाईन नाव नोंदणी तसेच, अर्ज सादर करण्यासाठी इथे क्लिक करा.
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना माहिती PDF:
• अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकरीता अर्थसंकल्पित रु.50.00 कोटी निधीपैकी रु.30.00 कोटी इतका निधी वितरीत करण्यात आला. (१४ जानेवारी, २०२२).pdf - डाऊनलोड करा.
• अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत सुधारित योजना राबविणे बाबत (२१ नोव्हेंबर, २०१७).pdf - डाऊनलोड करा.
• अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना माहिती.pdf - डाऊनलोड करा.
हे देखील वाचा - अल्पभूधारक शेतकरी योजना
या पोस्ट देखील तुम्हाला आवडू शकतात
• प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना
• 'Emergency Credit Line Guarantee Scheme' (ECLGS Scheme In Marathi)
0 टिप्पण्या
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत.