Ayushman Bharat Yojana in Marathi आयुष्मान भारत योजना


Ayushman Bharat Yojana in Marathi | आयुष्मान भारत योजना मराठी | आयुष्मान भारत योजना महाराष्ट्र | आयुष्मान भारत योजना रजिस्ट्रेशन ऑनलाइन | आयुष्मान भारत योजना पात्रता | प्रधानमंत्री जन आरोग्य योजना | Ayushman Bharat Yojana Eligibility | Pmjay | Ayshuman card | Ayushman Bharat Registration | Pmjay Registration

'सर्वांसाठी आरोग्य' या दृष्टिकोनातून 'आयुष्यमान भारत' या अभियानअंतर्गत 'प्रधानमंत्री जन आरोग्य योजना' २३ सप्टेंबर, २०१८ रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या द्वारे देशभरात लागू करण्यात आली. 'प्रधानमंत्री जन आरोग्य योजना' ही एक आरोग्य योजना आहे, जिचा उद्देश प्रत्येक कुटुबांला प्रतिवर्ष ५ लाख रुपये पर्यंतची आरोग्य सेवा पुरवली जाते.

Ayushman Bharat Yojana in Marathi | आयुष्मान भारत योजना मराठी | आयुष्मान भारत योजना महाराष्ट्र | आयुष्मान भारत योजना रजिस्ट्रेशन ऑनलाइन | आयुष्मान भारत योजना पात्रता | प्रधानमंत्री जन आरोग्य योजना | ayushman bharat yojana eligibility | pmjay | ayshuman card | Ayushman Bharat Registration | pmjay registration

आयुष्यमान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजना वैशिष्ट्ये:

आयुष्यमान भारत अभिअयानअंतर्गत प्रधानमंत्री योजनेची काही ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत:

• प्रधानमंत्री जन आरोग्य योजना पूर्णतः भारत सरकारद्वारे आरोग्य आर्थिक सहाय्य देणारी जगातील सर्वात मोठी आरोग्य हमी योजना आहे.

• ही योजना भारतातील सार्वजनिक आणि खाजगी सूचीबद्ध (listed) रुग्णालयात दुय्यम आणि तृतीयक आरोग्य उपचारांसाठी प्रति कुटुंब, प्रति वर्ष ५ लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाते.

• प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी ३ दिवस अगोदर आणि १५ दिवसांच्या वैद्यकीय उपचारानंतर, आरोग्य उपचार आणि औषधे मोफत उपलब्ध दिली जातात.

• या योजनेअंतर्गत कुटुंबाचा आकार, वय किंवा लिंग यावर कोणतीही मर्यादा नाही.


• प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत पहिल्या दिवसापासून अगोदरपासूनच अस्तित्वात असलेल्या वैद्यकीय परिस्थिती आणि गंभीर आजारांचा समावेश केला जातो.

• प्रधानमंत्री जन आरोग्य ही एक पोर्टेबल योजना आहे म्हणजेच, लाभार्थी देशभरातील कोणत्याही सार्वजनिक किंवा खाजगी सूचिबद्ध रुग्णालयात याचा लाभ घेऊ शकतात.

• योजनेमध्ये सुमारे 1,393 प्रक्रिया आणि पॅकेजेस समाविष्ट आहेत जसे की औषधे, पुरवठा, निदान सेवा, डॉक्टर्स फी, रूम फी, O-T आणि I-C-U फी इत्यादी जे मोफत उपलब्ध आहेत.

• खाजगी रुग्णालयांना, सार्वजनिक रुग्णालयांच्या बरोबरीने आरोग्य सेवांसाठी प्रतिपूर्ति (Reimbursement)  केली जाते.

आयुष्यमान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लाभ:

केंद्र सरकारमार्फत देशभरात राज्य स्तरांवर विविध आरोग्य विमा योजना राबविल्या जातात, ज्यामध्ये प्रति कुटुंब ३०,००० ते ३,००,००० रुपयांपर्यंत आरोग्य सेवा/कव्हरेज दिले जाते.  मात्र, आयुष्यमान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत रुपये ५,००,००० पर्यंत  आरोगय सेवा देणारी एकमेव योजना आहे. या योजनेमध्ये खालील उपचार सेवा मोफत केले जातात. Ayushman Bharat Yojana Benefits in Marathi.

• वैद्यकीय तपासणी, उपचार

• रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीचा खर्च

• औषधे आणि वैद्यकीय वस्तू

• क्लिनिकल आणि प्रयोगशाळा चाचण्या

• वैद्यकीय आरोपण सेवा (जेथे आवश्यक असेल)

• रुग्णालयात मुक्काम

• रुग्णालयात अन्न खर्च

• उपचारादरम्यान उद्भवणारी गुंतागुंत

• रुग्णालयात दाखल केल्यानंतर 15 दिवसांपर्यंत आरोग्य सेवा.

आयुष्यमान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत, ५,००,००० रुपयांचा लाभ संपूर्ण कुटुंबासाठी उपलब्ध आहे, म्हणजेच तो कुटुंबातील एक किंवा सर्व सदस्य वापरू शकतात. आरएसबीवाय RSBY योजनेंतर्गत कुटुंबात पाच सदस्यांची मर्यादा होती. त्या योजनेमधील त्रुटी लक्षात घेऊन, प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की, योनजेचा लाभ मिळविण्यासाठी कुटुंबाच्या आकारावर किंवा सदस्यांच्या वयावर मर्यादा नाही. याशिवाय, या योजनेत पहिल्या दिवसापासून विविध आजारांचा समावेश करण्यात आला आहे. याचा अर्थ असा की प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये नावनोंदणी करण्यापूर्वी कोणत्याही प्रकारचा रोग किंवा आरोग्य स्थिती ग्रस्त असलेल्या व्यक्तीला पहिल्या दिवसांपासून सर्व वैद्यकीय उपचार दिले जातात.

आयुष्मान भारत योजना पात्रता:

आयुष्मान भारत योजनेतील लाभार्थ्यांची निवड (Ayushman Bharat Yojana Eligibility) सामाजिक-आर्थिक जात गणना (एसईसीसी -2011 - SECC 2011)) च्या आधारे या योजनेतर्गत लाभार्थ्यांची निवड केली जाते. आयुष्मान भारत योजनेची माहिती देण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान जन आरोग्य योजना ऑनलाईन वेबसाइट सुरू केली आहे. या संकेतस्थळावर आयुष्मान भारत लाभार्थी यादी आपण तपासू शकता.

याशिवाय, जी कुटुंबे आधीपासून राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना (RSBY) चे लाभार्थी होती परंतु SECC 2011 चा भाग नाही त्यांचाही आयुष्मान भारत योजना या योजनेत समावेश करण्यात आला आहे.

SECC मध्ये सामाजिक-आर्थिक स्थितीच्या आधारावर कुटुंबांची क्रमवारीनुसार प्राधान्य दिले जाते. ग्रामीण भागातील कुटुंबे जी समाविष्ट आहेत त्यांना खालीलप्रमाणे निकषांच्या आधारावर क्रमवारी दिली जाते. शहरी कुटुंबांचे वर्गीकरण व्यवसायाच्या श्रेणीनुसार केले जाते.

आयुष्मान भारत योजना - ग्रामीण लाभार्थी:

आयुष्मान भारत योजना - प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ मिळविण्यासाठी SECC 2011 डेटाबेस मध्ये सामाविष्ट असलेले ग्रामीण लाभार्थीना खालील निकषांच्या आधारे प्राधान्यक्रम दिले जाते.

१. ज्या कुटुंबाचे घर फक्त एक खोली ज्यात कच्ची भिंती आणि छत आहे.

२. ज्या कुटूंबात १६ ते ५९ वयोगटातील कोणताही प्रौढ सदस्य नाही.

३. अक्षम सदस्य आणि सक्षम शरीर नसलेला प्रौढ सदस्य.

४. SC/ST घरे

५. भूमिहीन कुटुंबे ज्यांना त्यांच्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा अंगमेहनतीतून मिळतो.

आयुष्मान भारत योजना - शहरी लाभार्थी:

आयुष्मान भारत योजना - प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ मिळविण्यासाठी SECC 2011 डेटाबेस मध्ये सामाविष्ट असलेले शहरी लाभार्थीना खालील निकषांच्या आधारे प्राधान्यक्रम दिले जाते.

शहरी भागांसाठी, खालील 11 व्यावसायिक श्रेणीतील कामगार या योजनेसाठी पात्र आहेत:

१. कचरा उचलणारे

२. भीक मागून उदर निर्वाह करणारे

३. घरगुती कामगार

४. रस्त्यावरील विक्रेते / चर्मकार / फेरीवाले इत्यादी

५. बांधकाम कामगार / प्लंबर / मजदूर / पेंटर / वेल्डर / सुरक्षा रक्षक / कुली आणि इतर हेड लोडर

६. सफाई कामगार / सफाई कर्मचारी / माळी

७. वाहतूक कर्मचारी/वाहन चालक/वाहक/चालक/वाहक सहाय्यक/गाडी ओढणारा/रिक्षाचालक

८. दुकानातील कामगार / सहाय्यक / छोट्या संस्थांमधील शिपाय / मदतनीस / 

९. परिचर / वेटर, इलेक्ट्रिशियन / मेकॅनिक / असेंबलर / दुरुस्ती कामगार

१०. धोबी / पहारेकरी

आयुष्मान भारत योजना - प्रधानमंत्री जन आरोग्य योजना कुटुंबांच्या पात्रतेचा आधार म्हणून SECC चा वापर करत असले तरी, अनेक राज्ये आधीच ओळखल्या गेलेल्या लाभार्थ्यांच्या यादीसह त्यांच्या स्वत:च्या आरोग्य विमा योजना राबवत आहेत. अशा प्रकारे, राज्यांना आयुष्मान भारत योजना - प्रधान मंत्री जन आरोग्य योजनासाठी त्यांचा स्वतःचा डेटाबेस वापरण्याची स्वायत्तता देण्यात आली आहे. तथापि, या राज्यांनी SECC डेटाबेसवर आधारित सर्व कुटुंबांचा समावेश सुनिश्चित करणे आवश्यक आहे.


आयुष्मान भारत योजना महाराष्ट्र:

केंद्र शासनाने आयुष्यमान भारत कार्यक्रम देशभरात सुरु केला होता. या अभियानअंतर्गत, दिनांक, २३ सप्टेंबर, २०१८ पासून महाराष्ट्र राज्यामध्ये राबिविण्यास सुरुवात झाली. त्याचबरोबर, केंद्र शासनाची प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि राज्य शासनाची महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना स्वतंत्रपणे राबविल्या जात आहेत.

केंद्र शासनाने प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत १३४९ उपचार निश्चित केले आहेत. तर, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये ९७१ उपचार समाविष्ट आहेत. दोन्ही योजनेमधील २३२० उपचारांचा आढावा घेऊन १६३२ उपचारांची एकत्रित यादी तयार करण्यात आली आहे. त्यामध्ये, ५८१ उपचार दोन्ही योजनेमध्ये समाविष्ट आहेत. तर प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतील ६६१ उपचारांचा महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत समावेश नाही.

हे देखील वाचा: महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना

आयुष्मान भारत योजना रजिस्ट्रेशन ऑनलाइन:

आयुष्मान भारत अभियानाअंतर्गत प्रधानमंत्री जनआरोगय योजनेचा लाभ मिळविण्यासाठी खालीलप्रमाणे नोंदणी करता येऊ शकते. Ayushman Bharat Registration.

१. सर्वप्रथम प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर www.pmjay.gov.in वर भेट द्या.

२. त्यानंतर होमपेजवर 'AM I Eligible' हा पर्याय निवडा.

३. यानंतर, तुमचा मोबाईल क्रमांक टाकून 'OTP' पडताळणी करा.

४. नवीन पेज उघडेल त्यात, पात्रता तपासण्यासाठी तुमचे राज्य निवडा.

५. त्यानंतर, पात्रता तपासण्यासाठी नाव, रेशन कार्ड आणि मोबाईल क्रमांक यापैकी पर्याय निवडून सबमिट बटनवर क्लिक करा.

आयुष्मान भारत योजना ऑफलाईन अर्ज:

१. प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी (Ayushman Bharat Registration), प्रथम कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) वर आवश्यक कागदपत्रांसह भेट द्या  आणि सर्व कागदपत्रांची छायाप्रत सबमिट करा.

२. यानंतर, कॉमन सर्विस सेंटर चे कर्मचारी एजंट सर्व कागदपत्रांची पडताळणी करून, तुमच्या वतीने योजनेची नोंदणी करतील.

आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जण आरोग्य योजना आवश्यक कागदपत्रे - आधार कार्ड, रेशनकार्ड, पॅनकार्ड कार्ड, फोटो व मोबाईल क्रमांक.

३. त्यानंतर, १० ते १५ दिवसांनी तुम्हाला CSC केंद्राकडून आयुष्मान भारतचे गोल्डन कार्ड (Ayshuman card) दिले जाईल. अशा प्रकारे तुमची नोंदणी योजनेसाठी यशस्वी होईल.

टीप: आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ मिळविण्यासाठी आयुष्मान कार्ड असणे आवश्यक आहे.

आयुष्मान भारत योजना हॉस्पिटल लिस्ट:

आयुष्यमान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत सूचिबद्ध हास्पिटलांची यादी (Ayushman Bharat Yojana Hospital List) पाहण्यासाठी,   https://hospitals.pmjay.gov.in/Search/empnlWorkFlow.htm?actionFlag=ViewRegisteredHosptlsNew या योजेनच्या अधिकृत लिंकवर भेट द्या.

वरील लिंकला भेट दिल्यावर राज्य, जिल्हा, हॉस्पिटल प्रकार, वैशिष्ट्य, हॉस्पिटल नाव ( State, District, Hospital Type, Speciality, Hospitals Name) इत्यादी पर्यायांची निवड करून, कॅप्टचा टाका. त्यानंतर, तुम्हाला हॉस्पिटलचा ई-मेल, फोन नंबर आणि त्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला कोणत्या सुविधा दिल्या जातील याची माहिती तुम्हाला मिळेल.

आयुष्मान भारत योजना हेल्पलाइन नंबर:

सदर लेखमध्ये आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसंबंधित संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे तरीही, तुम्हाला कोणत्याही प्रकारची समस्या येत असेल तर तुम्ही टोल फ्री क्रमांकावर PM Ayushman Bharat Yojana Toll Free Number संपर्क करून तुमची समस्या सोडवू शकता. 14555/1800111565 हा टोल फ्री क्रमांक आहे. (Ayushman Bharat Yojana Helpline Number).

या पोस्ट देखील तुम्हाला आवडू शकतात

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना

प्रधानमंत्री जन धन योजना

माझी कन्या भाग्यश्री योजना

शेळी पालन ऑनलाईन अर्ज करा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या