महिला कर्ज योजना | व्यवसाय कर्ज योजना Business Loans for Women in Marathi

महिला कर्ज योजना मराठी | व्यवसाय कर्ज योजना | महिला कर्ज योजना Maharashtra | महिला कर्ज योजना | व्यवसाय कर्ज योजना मराठी । व्यवसाय कर्ज योजना महाराष्ट्र । व्यवसाय कर्ज माहिती Women Loan Scheme | Mahila Karj Yojana | Mudra Yojana Scheme for Women in Marathi | Mudra Business Loan for Women  | Government Scheme for Womens in Marathi | Mahila Udyam Nidhi Scheme in Marathi | Annapurna Loan Yojana | Stree Shakti Yojana in Marathi | Cent Kalyani Yojana in Marathi | Udyogini Yojana in Marathi | Oriental Mahila Vikas Yojana Scheme in Marathi

महिला कर्ज योजना मराठी | व्यवसाय कर्ज योजना | महिला कर्ज योजना Maharashtra | महिला कर्ज योजना | व्यवसाय कर्ज योजना मराठी । व्यवसाय कर्ज योजना महाराष्ट्र । व्यवसाय कर्ज माहिती Women Loan Scheme | Mahila Karj Yojana | Mudra Yojana Scheme for Women in Marathi | Mudra Business Loan for Women  | Government Scheme for Womens in Marathi | Mahila Udyam Nidhi Scheme in Marathi | Annapurna Loan Yojana | Stree Shakti Yojana in Marathi | Cent Kalyani Yojana in Marathi | Udyogini Yojana in Marathi | Oriental Mahila Vikas Yojana Scheme in Marathi

भारतीय संविधानाने कायद्यात महिलांना दिलेले मूलभूत हक्क आणि अधिकार हा स्त्रियांच्या विकासाचा पाया आहे. महिलांचे सबलीकरण, सक्षमीकरण करण्यासाठी, भारत सरकार देशातील महिलांसाठी/मुलींसाठी अनेक आर्थिक योजना राबवित असते. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी महिलांनी उद्योगधंदे, व्यवसाय करणे आवश्यक आहे. यासाठी त्यांना आर्थिक सहाय्य करून व्यवसायासाठी - उद्योगांसाठी कर्ज उपलब्ध करून देणे देखील गरजेचे आहे. त्यामुळेच, सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँकां, वित्तीय संस्थेमार्फत देशभरात अनेक कर्ज योजना राबविल्या जात आहेत. (Government Scheme for Womens in Marathi).

हे देखील वाचा: अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज योजना


महिला कर्ज योजनेमध्ये विशेषतः महिलांना केंद्रस्थानी ठेवून, त्यांना आर्थिक सहाय्य देण्यात येत आहे. यामध्ये महिलांसाठी व्यवसाय कर्ज, गृह कर्ज, शैक्षणिक कर्ज, विवाह कर्ज विशेष सवलतीमध्ये शासनामार्फत देण्यात येते.

देशातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगात गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामधे, महिलांचा समावेश वाढावा या दृष्टिकोनातून केंद्र आणि राज्य सरकारने महिलांनी स्वतःचे व्यवसाय-उद्योग सुरू करण्यासाठी आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी खालील व्यवसायिक कर्जे उपलब्ध करून दिली आहेत. महिला नवउद्योजकांसाठी स्वतःचा नवीन व्यवसाय-उद्योग सुरू करण्यासाठी किंवा त्याची वाढ करण्यासाठी केंद्र आणि  राज्य शासनाच्या अनेक योजना देशात सुरू आहेत. सदर लेखमध्ये महिलांसाठीची 9 व्यवसायिक कर्ज योजनांबाबत सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत.

1. महिला उद्यम निधी योजना (Mahila Udyam Nidhi Scheme) - रु. 10 लाख पर्यंत कर्ज सुविधा.

2. मुद्रा योजना (Mudra Yojana Scheme for Women) -  रु. 50,000 - रु. 50 लाख पर्यंत कर्ज सुविधा.

3. भारतीय महिला व्यवसाय बँक कर्ज योजना रु. 20 कोटी पर्यंत कर्ज सुविधा. 

4. अन्नपूर्णा योजना (Annapurna Loan Yojana) - रु. 50,000 पर्यंत कर्ज सुविधा.

5. स्त्री शक्ती पॅकेज (Stree Shakti Yojana) - रु. 50,000 ते रु. 25 लाख पर्यंत कर्ज सुविधा.

6. सेंट कल्याणी योजना (Cent Kalyani Yojana) - रु. 1 कोटी पर्यंत कर्ज सुविधा.

7. उद्योगिनी योजना (Udyogini Yojana) रु. 3 लाख पर्यंत कर्ज सुविधा.

8. ओरिएंटल महिला विकास योजना (Oriental Mahila Vikas Yojana Scheme) - रु. 10 लाख पर्यंत कर्ज सुविधा.

टिपा:

कर्ज योजनेचे व्याजदर हे बाजारदर व अनिश्चित असतात. अशा व्याजदरात किंवा एकूण कर्जावर शासनाकडून सवलत,सूट देण्यात येते.

• योजनेचा लाभ मिळविण्याठी अर्जदार महिलेने आवश्यक कागदपत्रांसह राष्ट्रीयकृत बँकेत भेट देऊन, पात्रता निकष अटी तपासून अर्ज करावा.

हे देखील वाचा: प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना


1. महिला कर्ज - महिला उद्यम निधी योजना

महिला उद्यम निधी योजना (Mahila Udyam Nidhi Scheme in Marathi) या योजनेंतर्गत पंजाब नॅशनल बँक आणि स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाद्वारे (SIDBI) रु. 10 लाखांपर्यंतचे कर्ज पुरविण्यात येते. लहान स्तरावरील उद्योग जसे की, ब्युटी पार्लर, डे केअर सेंटर, ऑटो रिक्षा इत्यादी सारख्या लघु उद्योगांसाठी हे कर्ज पुरवले जाते. कर्जाची रक्कम मिळाल्यानंतर 5 वर्ष कर्ज परतफेड नाही केली तरीही चालते (५ वर्ष मोरेटोरियम).  मात्र, कर्जाच्या रक्कमेची परतफेड जास्तीत जास्त १० वर्षात करावी लागते. व्याजदर हे एसआयडीबीआयने (Small Industries Development Bank of India) बाजारदराप्रमाणे निश्चित केलेले असतात. कर्ज मंजूर झाल्यावर संबंधित बँकांकडून १% वार्षिक सेवा कर आकाराला जातो. (Mudra Business Loan for Women).

2. महिला कर्ज - मुद्रा योजना

मुद्रा या योजनेंतर्गत Mudra Yojana Scheme for Women in Marathi वैयक्तिक किंवा समूहात नवीन व्यवसाय सुरु करणाऱ्या महिलांसाठी ८ एप्रिल, २०१५ रोजी मुद्रा योजना देशभरात सुरु करण्यात आली. योजनेसाठी  20,000 कोटीचे सरकारचे भक्कम भांडवली पाठबळ आहे. शिकवणी वर्ग, टेलरिंग सेंटर, ब्युटी पार्लर इत्यादीसारख्या लघुउद्योग सुरु करण्यासाठी या योजनेअंतर्गत रु. 50,000 ते रु. 50 लाख पर्यंत कर्ज सुविधा मिळते. योजनेमध्ये शिशू श्रेणी, किशोर श्रेणी, तरुण श्रेणी अशी वर्गवारी करण्यात आली आहे. त्यामध्ये, शिशू श्रेणी अंतर्गत  - रु. 50,000, किशोर श्रेणी - 50,000 ते 5 लाख आणि तरुण श्रेणी अंतर्गत 5 लाख ते 10 लाख रुपयांपर्यत कर्ज पुरविण्यात येते. या योजनेची विशेषतः म्हणजे कर्ज मिळविण्यासाठी गहाण किंवा जामिनाची आवश्यकता नाही. महिलांना कर्ज देताना मुद्रा कार्ड देखील देण्यात येते आणि हे मुद्रा कार्ड क्रेडिट कार्डप्रमाणे काम करते.

3. महिला कर्ज - भारतीय महिला व्यवसाय बँक कर्ज

भारतीय महिला व्यवसाय बँक कर्ज या योजनेंतर्गत 20 कोटी रुपयांपर्यंत कर्ज पुरवठा करण्यात येतो. उत्पादन उद्योग क्षेत्रात असणाऱ्या महिलांना क्रेडिट गँरेंटी फंड ट्रस्ट फॉर मायक्रो अँड स्मॉल एंटरप्रायझेस अंतर्गत कर्जावर 0.25% सूट दिली जाते. या कर्जाच्या रकमेवरील व्याजदर सर्वसाधारण 10.15% एवढा असतो. कर्जाच्या रक्कमेची परतफेड जास्तीत जास्त ७ वर्षांपर्यंत करणे आवश्यक असते. कर्जाची रक्कम 5 लाख पर्यंत असेल तर कोणत्याही प्रकारचे तारण ठेवण्याची गरज नाही. ही योजना भारतीय महिला बँकेद्वारे सुरू करण्यात आली होती. परंतु, 2017 मध्ये एसबीआय बँकेत विलीनीकरण करण्यात आले. (SBI - Business Loan for Women).

4. महिला कर्ज - अन्नपूर्णा योजना

महिला कर्ज - अन्नपूर्णा योजना Annapurna Loan Yojana या योजनेअंतर्गत फूड कॅटेरिंगचा व्यवसाय,पॅकेज्ड फूड, स्नॅक्स इत्यादी सारख्या व्यवसायांकरिता करणाऱ्या महिलांना 50 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज देण्यात येते. व्यवसायासाठी लागणारी उपकरणे, भांडी यांची  खरेदी करण्यासाठी या कर्जाचा वापर केला जाऊ शकतो. कर्जाची रक्कम ३ वर्षात परतफेड करावयाची असते. कर्ज घेण्यासाठी हमीदाराची (गॅरंटर) आवश्यकता असते.

5. महिला कर्ज योजना - स्त्री शक्ती पॅकेज

स्त्री शक्ती पॅकेज (Stree Shakti Yojana in Marathi) ही स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेतून राबवली जाते. ज्या महिलेची एखाद्या उद्योगात 50 टक्के पेक्षा भागीदारी असते, त्यांनाच हे कर्ज दिले जाते. याशिवाय, या महिलांनी त्यांच्या राज्य एजन्सीद्वारे आयोजित उद्योजकता विकास कार्यक्रम (EDP-Entrepreneurship Development Programme) मध्ये नोंदणी केलेली असावी. योजनेअंतर्गत 50 हजार ते 2 लाखपर्यंत कर्ज दिले जाते. एमएसएमईमध्ये (MSME) नोंदणीकृत असलेल्या कंपन्यांना 25 लाखांपर्यंत कर्ज मिळते. महिला उद्योजकाच्या कर्जाची रक्कम 20 लाख रु. पेक्षा जास्त असेल. त्याच्या व्याजदरावर 0.50% सूट देते. 5 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी कोणत्याही तारणाची गरज लागत नाही आणि व्याजदरात देखील सवलत मिळते.

6. महिला कर्ज - सेंट कल्याणी योजना

सेंट कल्याणी योजना (Cent Kalyani Yojana in Marathi) ही योजना सेंट्रल बँक ऑफ इंडियाद्वारे (Central Bank of India) सुरु करण्यात आली. शेती, हँडीक्राफ्ट्स, जेवणाचा व्यवसाय, कपडे बनवणे, ब्यूटी, कँटिन, हॉटेल, लायब्रेरी, यांसारखे  लघु आणि मध्यम उद्योग करू इच्छिणाऱ्या महिला उद्योजकांना या कर्जाचा लाभ घेता येतो. ही योजना रु. 1 कोटी पर्यंत कर्ज पुरवते. कर्ज घेण्यासाठी कोणत्याही हमीदाराची आवश्यकता नाही. कर्ज परतफेडीचा कालावधी ७ वर्षांचा असतो.

7. महिला कर्ज - उद्योगिनी योजना

उद्योगिनी योजना (Udyogini Yojana in Marathi) लघु व्यवसाय क्षेत्रातील व्यावसायिक, किरकोळ विक्रेते, उत्पादक, स्वयंरोजगार व्यावसायिक, व्यापारांसाठी जास्तीत जास्त 3 लाखांपर्यंतचे कर्ज पुरवले जाते. या कर्ज योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महिला १८ ते ४५ या वयोगटातील महिला घेऊ शकतात. मात्र, विधवा, निराधार असणाऱ्या महिलांना कोणतीही वयाची अट नाही. महिलेच्या कुटंबाचे वार्षिक उत्पन्न 150,000/- पेक्षा जास्त नसावे. या योजनेची विशेषतः म्हणजे, लाभार्थीला सरकार मार्फत कर्जामध्ये 30% अनुदान देण्यात येते. 

8. महिला कर्ज - ओरिएंटल महिला विकास योजना

ओरिएंटल महिला विकास योजना (Oriental Mahila Vikas Yojana Scheme in Marathi) ही योजना महिलांना ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स बँकेद्वारे 1 लाख ते 10 लाखांपर्यंत कर्ज पुरवते. ज्या महिलांकडे  वैयक्तिकरित्या किंवा संयुक्तपणे मालकी 51% मालकी हक्काची भांडवल आहे अशा महिलांना हे कर्ज देण्यात येते. या कर्जाचा लाभ घेण्यासाठी जामीनदाराची आवश्यकता नाही आणि. कर्ज परतफेडीचा कालावधी ७ वर्षाचा आहे. या कर्ज योजनेची विशेषतः म्हणजे, कर्जदार महिलांना 2% व्याजदरात दिली जाते.

हे देखील वाचा: कमवा आणि शिका योजना

या पोस्ट देखील तुम्हाला आवडू शकतात

अपंग पेन्शन योजना महाराष्ट्र

विधवा पेन्शन योजना

अटल पेन्शन योजना

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या