अंत्योदय अन्न योजना मराठी माहिती Antyodaya Anna Yojana in Marathi

Antyodaya Anna Yojana Scheme | Antyodaya Anna Yojana in Marathi | अंत्योदय अन्न योजना मराठी माहिती | Antyodaya Anna Yojana Beneficiary 2022-23 | अंत्योदय अन्न योजना | अंत्योदय अन्न योजना महाराष्ट्र | अंत्योदय अन्न योजना रेशन कार्ड

Antyodaya Anna Yojana Scheme देशातील गरीब कुटूंबांना अत्यंत कमी खर्चात रेशन उपलब्ध करून अन्न सुरक्षा देण्याच्या उद्देशाने दिनांक २५ डिसेंबर, २००२ रोजी केंद्रशासनाने अंत्योदय अन्न योजना देशभरात राबविण्यासाठी मान्यता दिली. अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत गरीब कुटूंबांना दरमहा ३५ किलो धान्य (गहू व तांदूळ) गहू रु. २.०० प्रति किलो व तांदूळ रु. ३.०० प्रति किलो या दरात देण्यात येतात.(अंत्योदय अन्न योजना महाराष्ट्र).

Antyodaya Anna Yojana Scheme | Antyodaya Anna Yojana in Marathi | अंत्योदय अन्न योजना मराठी माहिती | Antyodaya Anna Yojana Beneficiary | अंत्योदय अन्न योजना | अंत्योदय अन्न योजना महाराष्ट्र | अंत्योदय अन्न योजना रेशन कार्ड

अंत्योदय अन्न योजना लाभार्थी पात्रता

देशातील ग्रामीण आणि शहरी भागातही अंत्योदय अन्न योजना राबवली जाते. अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत लाभार्थी निवड करण्यासाठी केंद्र शासनाने वेळोवेळी राज्य शासनास केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार पात्र लाभार्थ्यांना अंत्योदय अत्र योजनेचे लाभ देण्याबाबत खालीलप्रमाणे सूचना देण्यात आल्या आहेत.


१) ज्या कुटुंबांचे प्रमुख विधवा स्त्रिया, आजारी किंवा अपंग किंवा ६० वर्षे वयावरील वृध्द आहेत व ज्यांना उदरनिर्वाहाचे निश्चित साधन नाही अथवा सामाजिक आधार नाही.

२) कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न 150,000/- पेक्षा जास्त नसावे.

३) एकटे राहात असलेले दुर्धर आजारग्रस्त / अपंग / विधवा / ६० वर्षावरील वृध्द, ज्यांना कुठलाही कौटुंबिक वा सामाजिक आधार अथवा कायम स्वरुपी उत्पन्नाचे साधन उपलब्ध नाही.

४) आदिम आदिवासी कुटुंबे (माडीया, कोलाम, कातकरी).

५) भूमिहीन शेतमजूर,अल्पभूधारक शेतकरी, ग्रामीण कारागीर उदा. कुंभार, चांभार, मोची, विणकर, सुतार, लोहार तसेच झोपडपट्टीतील रहिवासी विशिष्ठ क्षेत्रात रोजंदारीवर काम करुन उपजिविका करणारे नागरिक जसे हमाल, मालवाहक, सायकलरिक्षा चालविणारे, हातगाडीवरुन मालाची ने- आण करणारे, फळे आणि फुले विक्रेते, गारुडी, कचऱ्यातील वस्तु गोळा करणारे तसेच निराधार व अशाप्रकारे काम करणारे शहरी तसेच ग्रामीण भागातील कुटुंबे या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असतील.

६) कुष्ठरोगी / बरा झालेला कुष्ठरोगी कुटुंब प्रमुख असलेली कुटुंबे.

अंत्योदय अन्न योजना मार्गदर्शक सूचना

अंत्योदय अन्न योजनेबाबत केंद्र शासनाने, राज्य शासनास  दिनांक १६ मार्च, २००४ रोजी खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.

• अंत्यदोय कुटुंबांसाठी निवड झालेल्या कुटुंबांला अंत्योदय रेशनकार्ड मान्यताप्राप्त करण्यासाठी वेगळे कार्ड प्रदान केले जाते.

• अंत्योदय अन्न योजनेसाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांची नावे  बीपीएल यादीत नसली तरी सुद्धा त्या पात्र लाभार्थ्यांना अंत्योदय अन्न योजनेच्या शिधापत्रिका देण्यात याव्यात व त्याचवेळी त्यांची नावे बीपीएलच्या यादीत समाविष्ट करण्यात यावीत.

• कोणतीही पात्र आदिवासी कुटुंबे अंत्योदय अन्न योजनेच्या  लाभापासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी.

• आदिम जमातींच्या कुटुंबांची नावे सन १९९७ च्या बीपीएल यादीमध्ये नसली तरीही अंत्योदय अन्न योजनेचे लाभ मिळण्यासाठी दारिद्र्यरेषेखालील शिधापत्रिका असण्याची अट रद्द करण्यात आली आहे.

•  ग्रामीण भागातील पात्र लाभार्थ्यांची निवड झाल्यावर ग्रामसभा त्या यादीस ग्रामसभेची मान्यता घेण्यात यावी. ज्या ग्रामसभा लाभार्थ्यांच्या यादीस मंजुरी देणार नाहीत, अशा ग्राम ग्रामसभांना मंजुरी देण्याची पुन्हा विनंती करावी. अशी विनंती केल्यानंतरही ग्रामसभेने मंजुरी दिली नाहीतर त्याचे कारण नमूद करून पात्र लाभार्थ्यांची यादी जिल्ह्याधिकारी स्तरावर घोषित करण्यात यावी. (Antyodaya Anna Yojana Scheme).


अंत्योदय अन्न योजना 2023 मोफत धान्य:

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय अन्न अभियानअंतर्गत सुरू असलेली अंत्योदय अन्न योजनेच्या माध्यमातून गहू रु. २.०० प्रति किलो व तांदूळ रु. ३.०० प्रति किलो या दरात उपलब्ध करून देण्यात येतात. याशिवाय आता केंद्र शासनाने अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत १ जानेवारी, २०२३ पासून पुढील एक वर्षासाठी मोफत अन्न धान्य देण्याचा निर्णय केंद्रशासनाने दि. २८/१२/२०२२ रोजीच्या पत्रान्वये घेतला आहे. त्यानुसार दि. १ जानेवारी, २०२३ ते दि. ३१ डिसेंबर, २०२३ या कालावधीत लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य वितरण करण्यात येणार आहे. याबत केंद्र शासनाने खालीलप्रमाणे मागदर्शक सूचना केल्या आहेत. (Antyodaya Anna Yojana in Marathi).

१. मोफत अन्नधान्य वितरण केल्याची स्वतंत्र पावती लाभार्थ्यांना देण्यात यावी.

२. वितरीत अन्नधान्याच्या पावतीवर मोफत अन्नधान्य वितरण भारत सरकारद्वारे दिले जाणार आहे असे ठळकपणे सूचित करावे.

३. अन्नधान्याच्या वितरणासाठी स्वतंत्र बायोमॅट्रिक प्रमाणीकरण करावे.

अंत्योदय अन्न योजनेला लाभ मिळविण्यासाठी असा करा अर्ज

अंत्योदय अन्न योजनेचा (AAY) लाभ मिळविण्यासाठी अन्न पुरवठा विभाग किंवा जवळच्या सार्वजनिक केंद्राशी संपर्क करा. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्याकडून अंत्योदय अन्न योजनेचा फॉर्म मिळवा, अर्जातील विचारलेली माहिती भरून आवश्यक कागदपत्रे फॉर्म सोबत जोडा आणि फॉर्म कार्यालयात सबमिट करा.

अंत्योदय अन्न योजनेच्या नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे:

- लाभार्थीचा उत्पन्न दाखला

- बीपीएल प्रमाणपत्र

- रहिवासी दाखला

- ओळखीचा पुरावा (आधार कार्ड)

- कोणतेही रेशन कार्ड नसल्याचे प्रमाणपत्र

अंत्योदय अन्न योजना pdf

अंत्योदय अन्न योजना लाभार्थ्यांची निवड व योजनेच्या अमंलबजावणी बाबत महाराष्ट्र शासनाचा जिआर (GR) पहाण्यासाठी इथे क्लिक करा.

या पोस्ट देखील तुम्हाला आवडू शकतात

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या