Mahila Samman Bachat Patra Yojana Marathi महिला सन्मान बचत पत्र योजना मराठी | महिला सन्मान बचत योजना | महिला सन्मान योजना महाराष्ट्र | महिला सन्मान बचत पत्र योजना अधिकृतपणे कधी सुरू झाली | महिला सम्मान बचत पत्र योजना 2023
निर्मला सितारामण यांनी बजेटमधून महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी ८१ लाख महिला बचतगटांचे सबलीकरण करण्यात येणार आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. त्यानुसार त्यांच्या ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी नवीन योजना आखण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने अर्थमंत्र्यांनी महिलांसाठी एक नवीन योजना सुरु केल्याची घोषणा केली.
महिला सन्मान बचत पत्र अशी ही योजना असून, दोन वर्षाच्या कालावधीसाठी मुलींना व महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल. याचा कालावधी मार्च २०२५ मध्ये पूर्ण होईल. महिला सन्मान बचत पत्र या योजनेअंतर्गत २ लाखा पर्यंतची रक्कम २ वर्ष मुदतीसाठी ७.५ टक्के इतक्या व्याजदराने महिल्यांच्या किंवा मुलींच्या नावे जमा करता येईल. यामध्ये अंशतः रक्कम काढण्याची सुविधा आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महिला सन्मान बचत पत्र योजना ही नवी योजना भारत सरकारने सुरू केली. मार्च २०२५ पर्यंत ही योजना सुरू असणार आहे. Mahila Samman Bachat Patra Yojana Marathi.
महिला सन्मान बचत पत्र योजनेअंतर्गत आतापर्यंत एवढ्या महिलांनी लाभ घेतला
खास महिला व मुलांसाठी जाहीर करण्यात आलेल्या 'महिला सन्मान बचत पत्र योजने' अंतर्गत आतापर्यंत १४ लाख ८३ हजार खाती उघडण्यात आली आहेत आणि गुंतवणूक रूपाने ८,६३९ कोटी रुपये जमा केले गेले आहेत. अशी माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री यांनी दिली आहे.
वार्षिक ७.५% टक्के व्याजदाराची हमी असलेल्या या दोन वर्षे मुदतीच्या योजनेत, महिला व मुलींना किमान १००० रुपये कमाल दोन लाख रुपये मर्यादेपर्यंत गुंतवणूक करता येते.
महिला सन्मान बचत पत्र योजना पात्रता:
• महिला सन्मान बचत पत्र योजनेचा लाभ केवळ मुली आणि महिला घेऊ शकतात.
• योजनेमध्ये वयाची कोणतीही अट नाही.
• मुलगी किंवा महिला स्वतःसाठी बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये खातं उघडू शकते. अल्पवयीन असलेल्या मुलीचं खातं उघडण्यासाठी पालकांची गरज लागते.
महिला सन्मान बचत पत्र योजना ठळक वैशिष्ट्ये
महिला सन्मान बचत पत्र योजनेची मुदत
• या योजनेची मुदत २ वर्षांची आहे.
• महिला सन्मान बचत पत्र योजनेचे कार्यकाळ ३१ मार्च, २०२३ पर्यंत असेल.
ठेवींचे नियम
• किमान एक हजार रुपये आणि त्यापुढे शंभरच्या पटीत कितीही रक्कम ठेवता येऊ शकते.
• कमाल गुंतवणूकीची मर्यादा २ लाख एवढी आहे.
• या योजनेतील ठेवींवर लागू होणारा व्याजदर ७.५ टक्के आहे.
• ठेवीदार खातं सुरु केल्यानंतर १ वर्ष पूर्ण झाल्यावर त्यावेळी जमा रकमेच्या ४०% रक्कम काढू शकतो. त्यासाठी संबंधित पोस्ट ऑफिस किंवा बँकेच्या शाखेत अर्ज करावा लागतो.
• ही रक्कम १ वर्ष पूर्ण झाल्यावर आणि ठेवीची मुदत संपण्यापूर्वी एकदाच काढता येते.
मुदतपूर्व खाते बंद करणे
• खातेदाराचा मृत्यू झाल्यास
• खातेदाराला काही असाध्य आजार जडल्यास, ज्यामुळे त्यांना पैशाची गरज भासली तर.
• अल्पवयीन खातेदाराच्या पालकांचा मृत्य झाल्यामुळे खातं चालू ठेवणं शक्य नसेल तर खातं मुदतीपूर्व बंद करता येईल. या परिस्थितीमध्ये खातं मुदतीपूर्वी बंद केल्यास ठेवीवर नमूद केलेला व्याजदर म्हणजे ७. ५ टक्के एवढा मिळेल.
• याव्यतिरिक्त इतर कारणांनी खातं बंद केल्यास खाते उघडल्याचा तारखेपासून सहा महिन्यानंतर खातं बंद करता येतं. अशा प्रकारे खातं बंद केल्यास मिळणारा व्याजदर नमूद केलेल्या व्याजदरपेक्षा दोन टक्क्यांनी कमी असेल. म्हणजेच ५.५ टक्के व्याजदर मिळेल. (महिला सन्मान बचत पत्र योजना मराठी).
या पोस्ट देखील तुम्हाला आवडू शकतात
0 टिप्पण्या
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत.